कर्तव्यपथावरील कर्तव्यांचे काय?
केंद्र सरकारने आधी दिल्लीतील राजपथाचे नाव बदलून कर्तव्यपथ केले. गुरूवारी ८ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या कर्तव्यपथावरील पुतळ्याचे अनावरण केले. या नावबदलाच्या प्रकरणावर आता सर्व स्तरातून टीका होते आहे. त्यात वकिल आणि मानवाधिकारांसाठी संघर्ष करणारे असिम सरोदे यांनी देखील पंतप्रधान मोदींना कर्तव्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं काय म्हणाले आहेत असिम सरोदे पाहुयात.;
केंद्र सरकारने आधी दिल्लीतील राजपथाचे नाव बदलून कर्तव्यपथ केले. गुरूवारी ८ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या कर्तव्यपथावरील पुतळ्याचे अनावरण केले. या नावबदलाच्या प्रकरणावर आता सर्व स्तरातून टीका होते आहे. त्यात वकिल आणि मानवाधिकारांसाठी संघर्ष करणारे असिम सरोदे यांनी देखील पंतप्रधान मोदींना कर्तव्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं काय म्हणाले आहेत असिम सरोदे पाहुयात.
मानवी विकास निर्देशांकात 191 देशांच्या यादीत भारताची घसरण 132 व्या स्थानापर्यंत झाली आहे.
मानव विकास निर्देशांकाद्वारे एखाद्या देशातील आरोग्य, शिक्षण, नोकरी व व्यवसायातील स्थिरता व आयुर्मानातील घट होण्याची कारणे यांचा शास्त्रीय अभ्यास करून अधोगती का झाली याचे कारणांसह विश्लेषण केले जाते.
बेरोजगारी, आहे ते नोकरी-व्यवसाय टिकवता येणार नाही यांची भीती, जीवनाच्या अस्थिरतेचे सावट, युद्ध प्रादेशिक तणाव, (साथरोग हे एक कारण जगभर आहे), स्त्री-पुरुष समानता नसणे, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सुमार प्रगती, ऊर्जेचा अपव्यय आणि ऊर्जेची कमतरता यातून निर्माण झालेले संकट व उद्योग-व्यवसायांवरील परिणाम यामुळे आर्थिक घसरण ही भारताच्या बाबतीत असलेली अनेक कारणे आहेत. याविषयांवर काम केले गेले नाही का? हे सगळे विषय आपल्या कर्तव्यांचा भाग आहेत असे आपल्या सगळ्यांना वाटत नाही का? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
'मानवी विकासाची व्याख्या लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया' अशी केली आहे व इथे सामाजिक न्यायाचा विषय महत्वाचा ठरतो. माझ्या अनेक जिंकणाऱ्या व हरणाऱ्या केसेस मधून मी याच 'स्वातंत्र्य व जबाबदारीचे' विषय मांडण्याचा व चर्चेत आणायचा प्रयत्न करतो. मानवी विकास हा माझ्या सामाजिक-कायदेविषयक कामाचा मूळ आधार असल्याने मला वाटते की माणूस म्हणून, नागरिक म्हणून, संवेदनशील व्यक्ती म्हणून कर्तव्यपालन करणाऱ्या लोकांची भारतात निर्माण होणारी कमतरता, माणुसकीप्रधान विचारांची होणारी घसरण हा चिंतेचा मुद्दा आहे.