मॅक्स महाराष्ट्रच्या युट्युब चॅनलचा ६ लाख सब्सक्राइब आणि १५ कोटी दर्शकांचा टप्पा पार
मॅक्स महाराष्ट्रच्या युट्युब चॅनलने आज सहा लाख सबस्क्राईबर्सचा मोठा टप्पा पार केला आहे. युट्युब चॅनल हॅक होण्याची घटना, सातत्याने युट्युबकडून येत असलेले रीस्ट्रीक्शन्स, चॅनलविरोधात चालवलेली अनसबस्क्राईबची मोहीम याद्वारे चोहोबाजूंनी केलेली आर्थिक कोंडी भेदत सुमारे १५ कोटी दर्शकांचा टप्पा पार करणे ही मोठी गोष्ट आहे. मॅक्स महाराष्ट्र विरोधात मोहिमा चालवल्या गेल्या तरीही मॅक्स महाराष्ट्रने दबावाला बळी न पडता मोठे आर्थिक नुकसान झेलूनही जनतेसोबतची बांधीलकी कायम ठेवली. वंचितांचा आवाज अधिकाधिक बुलंद केला. चांद्या पासून बांध्या पर्यंत जनतेचे प्रश्न चव्हाट्यावर आणले. मुख्य माध्यमांमध्ये सातत्याने दुर्लक्षित असलेल्या जनतेचे प्रश्न मुख्य पटलावर आणले. मॅक्स महाराष्ट्र तब्बल सात वर्षाचा खडतर प्रवास पूर्ण करत आहे.
सुमारे १५ कोटी दर्शकांनी मॅक्स महाराष्ट्र पाहिले आहे. मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या अनेक बातम्यांची दखल मंत्रालयात देखील घेतली गेली. आपला प्रश्न मॅक्स महाराष्ट्रवर आला म्हणजे आपल्याला न्याय मिळतो अशी जनतेची भावना निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न,ग्रामीण आदिवासी भागातील आरोग्य भौतिक सुविधांचा प्रश्न, यांना मॅक्स महाराष्ट्रने नेहमी अग्रक्रम दिला. आदिवासींच्या संस्कृती, आदिवासी परंपरा आदिवासींच्या समस्या यांच्याविषयी संशोधनात्मक रिपोर्ट केले.
वंचित भटक्या समूहांना मॅक्स महाराष्ट्रने न्याय मिळवून दिला आहे. सोलापूर येथे फुगा विकून पोट भरणाऱ्या पारधी समाजाला देशद्रोही ठरविण्याचा धादांत खोटा प्रकार मॅक्स महाराष्ट्रने उघड केला. या प्रकरणातील सत्य लोकांच्या समोर आणले. तुरुंगातील पारध्यांवर होणारा अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाची दखल राज्याच्या मागासवर्गीय आयोगाने देखील घेतली.
जात वास्तव समोर आणणारे दलितांवरील अन्याय अत्याचारांची अनेक प्रकाराने मॅक्स महाराष्ट्रने समोर आणली. जाती तोडण्यासाठी सवर्ण समजल्या जाणाऱ्या जातीने पुढाकार घ्यायला हवा या भूमिकेतून जात प्रश्नावर सखोल असा जाती तोडा माणूस जोडा असा परिसंवाद आयोजित केला. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार लैंगिक समानतेसंदर्भात महत्वपूर्ण भूमिका घेत विशेष रिपोर्ट केले.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मॅक्स महाराष्ट्रने आज गरुड झेप घेतलेली आहे. रवींद्र आंबेकर यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. पत्रकारिता म्हणून आज मॅक्स महाराष्ट्र उभे राहिलेले दिसत असले तरीही संस्थेची अर्थिक परिस्थिती आजही नाजूक आहे. स्वतंत्र पत्रकारितेच्या या चळवळीला लोकांनी आर्थिक आधार द्यायला हवा होता पण मॅक्स ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करते ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करते तो वर्गच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने तो हातभार लागू शकलेला नाही.
मॅक्स महाराष्ट्र युट्युबवर आणलेल्या बंधनांच्या संदर्भात युनोमध्ये आवाज उठवला गेला. आजही राज्यातील बहुतांश जनता मॅक्स महाराष्ट्रच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जनतेचे हेच बळ आम्हाला अधिकाधिक धारदार पत्रकारिता करण्यास प्रेरणा देते. मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांमुळे आपण हा टप्पा पार केला आहे. त्याबद्धल प्रेक्षकांचे आभार