ग्रामीण भागात कोरोना चा शिरकाव! जळगाव मध्ये 5 रुग्णांचा मृत्यू, राज्यात रुग्णांची संख्या 22 हजारांच्यावर
राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४१९९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर २२ हजार १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४४ हजार ३२७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १९, पुण्यातील ५,जळगाव शहरात ५,धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवड मध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदूरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत. तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणा-या इतर आजारांबाबत १७ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १३, ७३९ (५०८)
ठाणे: १२१ (२)
ठाणे मनपा: ८८० (८)
नवी मुंबई मनपा: ८२६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३५१ (३)
उल्हासनगर मनपा: २६
भिवंडी निजामपूर मनपा: ३० (२)
मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)
पालघर: ३४ (२)
वसई विरार मनपा: २२९ (१०)
रायगड: ९२ (१)
पनवेल मनपा: १३८ (२)
ठाणे मंडळ एकूण: १६,६८० (५४४)
नाशिक: ५९
नाशिक मनपा: ३८
मालेगाव मनपा: ५६२ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ४५ (३)
जळगाव: १४४(१२)
जळगाव मनपा: ३४ (७)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: ९७६ (६४)
पुणे: १६२ (५)
पुणे मनपा: २३७७ (१४६)
पिंपरी चिंचवड मनपा: १४० (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: २४१ (११)
सातारा: ११९ (२)
पुणे मंडळ एकूण: ३०४८ (१६८)
कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ३६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ९८ (३)
औरंगाबाद:९३
औरंगाबाद मनपा: ४७५ (१३)
जालना: १२
हिंगोली: ५९
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ६४१ (१४)
लातूर: २५ (१)
लातूर मनपा: १
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ४
नांदेड मनपा: ३९ (३)
लातूर मंडळ एकूण: ७३ (४)
अकोला: १७ (१)
अकोला मनपा: १४२ (१०)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९६
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३६२ (२४)
नागपूर: २
नागपूर मनपा: २४९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २५७ (२)
इतर राज्ये: ३६ (९)
एकूण: २२ हजार १७१ (८३२)
(टीप - आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३०८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. मागील काही दिवसातील ६६५ कोविड बाधीत रुग्ण आय सी एम आर यादीनुसार आज अद्ययावत झाल्याने या रुग्णसंख्येचा समावेश आजच्या दैनंदिन आकडेवारीत करण्यात आलेला नाही तथापि ते एकूण रुग्ण संख्येत समाविष्ट आहेत.ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १६०६९२३ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२३७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ७६८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.