धोका वाढला: राज्यात दिवसभरात कोरोनाचे 27 बळी, रुग्णांची संख्या 8,590 वर
आज राज्यात कोरानाचे 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 1282 करोना बाधीत रुग्णांवर यशस्वी इलाज झाला आहे. आज दिवसभरात घेण्यात आलेल्या टेस्ट मध्ये 522 नवीन रुग्णाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या..
मृत्यू:
आज राज्यात 27 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू
राज्यातील एकूण रुग्णांची संख्या...
आज राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 8590 वर पोहोचली आहे.
आज राज्यात एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख २ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एच आय व्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.
राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.