राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे SDRF चे स्वतंत्र खाते आज राज्यसरकारने निर्माण केले आहे. राज्यावर कुठलीही आपत्ती आली तर या खात्यात केंद्र सरकारचे एनडीआरएफचा विभाग पैसे टाकत असतो. तसंच या खात्यामध्ये उद्योगपतींनी दिलेला निधी CSR म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.
राज्यामध्ये फडणवीस सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर असो की सुका दुष्काळ असो तरीही फडणवीस सरकारने हे खाते काढले नव्हते. वास्तविक केंद्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून निधी घेताना राज्य सरकारला हे खाते आवश्यक असते.
या संदर्भात संजय लाखे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या संदर्भात फडणवीस सरकारला फटकारले देखील होते. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात हे खाते न उघडता कंपन्यांना परस्पर ओल्या दुष्काळात काम करण्याच्या सूचना फडणवीस सरकारने दिल्या होत्या.
त्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकार ने देखील याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र, आता राज्यावर कोरोनाचं संकट आले असताना राज्य सरकारला उद्योगपतींकडून CSR अंतर्गत पैसा घेता येत नव्हता. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने...
Covid 19: फडणवीसांच्या काळातच CSR घेण्यासाठी बॅकेचं अकाउंट का निर्माण केलं नाही?
या ठळक मथळ्याखाली वृत्त देत उद्योगपती PM Care Fund मध्ये पैसे देऊ शकतात. मात्र, महाराष्ट्र सरकारला देऊ शकत नाही. ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तहान लागलेल्या ठाकरे सरकारने खाते उघडले आहे.
सध्या राज्य आर्थिक संकटातून जात आहे. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून निधी उभारण्यात येत आहे. यासाठी आता शासनाने "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण " या नावाने स्वतंत्र बॅक खाते उघडले आहे. तसंच उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उदारपणे योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
महाराष्ट्र शासनाने " महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण" या नावाने स्वतंत्र बैंक खाते स्टेट बैंक ऑफ इंडिया, कुलाबा,मुंबई येथे उघडले आहे. आपत्तीचा सामना समर्थपणे करण्यासाठी हा निधी/फंड राज्यास निश्चितपणे उपयक्त ठरेल. उदयोगांचे सामाजिक दायित्व निधी (Corporate Social Responsibility) मधून उद्योग जगताकडून भरघोस निधी या खात्यामध्ये देणगीव्दारे जमा करावा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे.
या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा निधी कंपनी अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार सीएसआर साठी पात्र आहे.
बँक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
खात्याचे नाव :- महाराष्ट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी
बँक खाते क्रमांक :- 39265578866
बँकेचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, वुड हाऊस रोड, कुलाबा, मुंबई .
ब्रँच कोड :- 572
आयएफएससी (IFSC) :- SBIN0000572
एमआयसीआर (MICR):- 400002087