दिलासादायक: जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीत 21 रुग्णांना डिस्चार्ज

Update: 2020-05-11 01:16 GMT

जळगाव जिल्ह्यात अत्यंत वेगाने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पण केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार रविवारी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधीत 172 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तींमध्ये अमळनेर मधील 9, भुसावळ मधील 7, आणि जळगावमधील 5 व्यक्तींचा समावेश आहे. तर यापूर्वी जळगाव आणि अमळनेरमधील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील 23 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या कोरोनाबाधित रुग्णांनी आवश्यक तो कालावधी पूर्ण केल्याने तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याने त्यांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या व्यक्तींना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली सात दिवस होम क्वांरटाईन ठेवण्यात येणार आहे.

Similar News