देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मे महिन्यात ७५ हजारांपर्यंत वाढू शकते. असा अंदाज मुंबईत आलेल्या केंद्रीय टीमने व्यक्त केला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची सद्य स्थिती आणि रुग्णांची वाढणारी संख्या याचा अभ्यास करून केंद्रीय टीमने हा अंदाज व्यक्त केलाय.
मुंबई महानगरपालिकेच्या एका सिक्रेट रिपोर्टमध्ये केंद्रीय पथकाच्या अंदाजाबाबत माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी हा अहवाल खरा असल्याचं सांगितलं. मात्र, सद्यस्थिती पाहता त्यांनी हा अहवाल दिला आहे. मात्र, आम्ही रोखण्यात यशस्वी होऊ असं पेडणेकर यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं आहे.