देशात २४ तासात ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Update: 2020-04-28 04:41 GMT

देशभरात गेल्या २४ तासात ६२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या ९३४वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे नवीन १ हजार ५४३ रुग्ण आढळल्याने आता एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २९ हजार ४३२वर पोहोचली आहे. दरम्यान कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ८६८वर पोहोचली आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या ता ८ हजार ५९० वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३६९ पोहोचली आहे. त्यानंतर सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये असून ही संख्या ३ हजार ५४८ झाली आहे, तर मृतांची संख्या १६२ वर पोहोचली आहे.

Similar News