मालेगावातील कोरोना रुग्णांची संख्या १६२वर

Update: 2020-04-28 04:28 GMT

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात एकाच वेळी तब्बल ३६ नवीन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील चौघांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मालेगावमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १६२ वर पोहोचली आहे. शहरातील कसमादे परिसरात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Similar News