व्हायरल झालेल्या महिलेच्या फोटोचं सत्य काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृद्ध महिलेच्या फोटोचं सत्य काय? खोट्या माहितीला बळी पडण्याआधी ही बातमी नक्की वाचा;

Update: 2021-04-23 09:36 GMT

सध्या देशात कोविड-19 विषाणू धुमाकूळ घालत असताना... सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटोंमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे देशातल्या आरोग्य यंत्रणांवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उपचारासाठी रुग्णालयाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायेत. या संकट काळात सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप युनिर्व्हसिटीच्या माध्यमातून खोट्या माहितीचा प्रसार होत आहे.

टिपू सुलतान पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये एक वृद्ध महिला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन रस्त्यावर बसलेली आहे. तसेच फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये #कोरोनाकाळात _देशत्रस्त, असा हॅशटॅश दिला आहे.

आम आदमी पक्षाचे सदस्य पृथ्वी रेड्डी यांनी ही हा फोटो आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला असून सोशल मीडियावरील अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे.

काय आहे फोटोची सत्यता?

हा फोटोचा यांडेक्स रिवर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला असता हा फोटो इंडिया टाईम्स च्या 7 एप्रिल 2018च्या एका रिपोर्ट मध्ये सापडला.

ANI वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार आग्रा मेडिकल कॉलेजच्या बाहेर ती वृद्ध महिला ऑक्सिजन सिलेंडर मास्क लावून रुग्णवाहिकेची वाट पहात होती. त्यावेळी वृद्ध महिलेच्या मुलाने आपल्या खांद्यांवर ऑक्सिजन सिलेंडर घेतला होता. वृद्ध महिलेला एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत असतांना मधल्या काळातील हे दृश्य असल्याचं रिपोर्ट मधून समजलं. ANI च्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातला व्हिडिओ देखील देण्यात आला आहे.

पाहा काय आहे व्हिडिओ...

Full View

एनडीटीव्ही, टाइम्स ऑफ इंडिया आणि न्यूज 18 यासह अनेक वृत्तवाहिन्यांनी या संदर्भात रिपोर्ट केला होता. व्हायरल झालेला या वृद्ध महिलेचा फोटो सोशल मीडियावर करोना काळातील फोटो असल्याचा समजून नेटिझन्स शेअर करत आहे. परंतु हा फोटो 3 वर्षांपूर्वीचा असल्याचं शोध पडताळणीमध्ये समजले आहे.

या संदर्भातलं वृत्त Alt News या वृत्तसंस्थेनं दिल आहे. https://www.altnews.in/a-three-year-old-image-of-a-woman-and-her-son-carrying-oxygen-cylinder-viral-as-recent/

Tags:    

Similar News