Fact Check : शेतकरी आंदोलनात खरंच दारू वाटली जात आहे का?

Update: 2021-09-26 02:36 GMT

सध्या सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनामध्ये दारू वाटली जात असल्याचे कथित व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये काही लोक मोठ्या ड्रममध्ये दारूच्या बाटल्या रिकाम्या करताना दिसत आहेत.. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही लोक गर्दीत दारू वाटतांना दिसत आहेत. दरम्यान, एका फेसबुक युजरने हा व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, हे आंदोलन करणारे शेतकरी आहेत. या फेसबुक पोस्टला साधारण ४३,००० पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आलं आहे.

Full View

दरम्यान, भाजप समर्थक ऋषी बागरी यांनी देखिल दोन्ही व्हिडिओ शेअर करत शेतकरी आंदोलनाची थट्टा केली आहे.



यासोबतच, ट्विटर युजर रेनी लिनने देखील दोन्ही व्हिडिओ पोस्ट करत गैर - संसदीय भाषेत एक ट्विट लिहिले आहे.


ट्विटरवर हा व्हिडिओ शेतकरी आंदोलनाचा सांगत भलताच व्हायरल केला जात आहे. यासोबतच फेसबुक वर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

काय आहे सत्य...?

दरम्यान या व्हिडिओमध्ये कुठेही शेतकरी आंदोलनातील झेंडा किंवा पोस्टर पाहायला मिळत नाही. त्यामुळे हे व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील असल्याचे जवळपास दिसून येत नाही.

पहिला व्हिडिओ

पत्रकार संदीप सिंह यांच्या मदतीने पंजाबी की वर्ड चा वापर करून आम्हाला एक फेसबुक पोस्ट मिळाली, ज्याच्या कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलं आहे की, "शराब लंगर बाबा रोडे शाह". तसेच ही पोस्ट अनेक व्हिडीओ एकत्र करत बनवण्यात आली आहे. मात्र, पोस्टमधील व्हिडिओच्या २० सेकंदानंतर आपल्याला व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओचा एक भाग पाहायला मिळतो.

Full View

यासोबतच डेली न्यूज पंजाब द्वारे फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडिओ सुद्धा सापडला. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, "बाबा रोडे शाहजी यांच्या यात्रेत प्रचंड गर्दी". दरम्यान 'कौनके कलां' हे लुधियाना मधील एक गाव आहे. आणि तिथे बाबा रोडे शाह यांना दारू चढवण्याची प्रथा आहे. जी वर्षानुवर्षे चालत आली आहे. भक्त अगोदर दारू आणून बाबा रोडे शाह यांना चढवतात आणि मग ती प्रसादाच्या स्वरूपाने वाटली जाते.

Full View

यासोबतच आम्ही डेली न्यूज पंजाबशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडिओ हा बाबा रोडे शाह यांच्या यात्रेदरम्यानचाच आहे. सोबतच असंही सांगितलं की, वर्षानुवर्षे दारू चढवण्याची प्रथा चालत आलेली आहे.


या व्यतिरिक्त ६ सप्टेंबरला या यात्रे दरम्यान रेकॉर्ड केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये एक जांभळ्या रंगाचा टेंट दिसून येतो जो की, डेली न्यूज पंजाबच्या व्हिडिओमध्ये तसेच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये देखील दिसून येतो.



या व्हिडीओ संदर्भात Alt news च्या टीमने दर्गा समितीचे सचिव गुरमीत सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, "हा व्हिडिओ इथलाच आहे आणि व्हिडिओमधील सर्व मुलं दर्ग्यावर काम करतात. मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतो." अशी माहिती दिली. यासोबतच 'मेला बाबा रोडे जी मेला कौनके कलां जगराओं (LDH)' या कॅप्शन सह एक युट्यूब व्हिडिओ देखील सापडला. ज्यामध्ये ऑरेंज कलरच्या कुर्तामध्ये एका व्यक्तीला पाहिलं जाऊ शकतं. जो या व्हायरल व्हिडीओमध्ये देखिल दिसून येतो.

दुसरा व्हिडीओ

पत्रकार संदीप सिंह यांनी दर्ग्याला भेट दिली असता तेथील काही दृश्ये टिपली. जी या दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ठिकाणाशी अगदी मिळतीजुळती आहेत.

Full View


खाली आपण व्हायरल व्हिडिओ मधील स्क्रीनशॉट आणि रोडे शाह दर्ग्याच्या फोटोमधील साम्य पाहू शकतो.


निष्कर्श:

शेतकरी आंदोलनाशी जोडत लुधियानामधील एका प्रार्थनास्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. गावात दारू अर्पण करण्याची एक जुनी प्रथा आहे. मात्र या प्रथेचा किंवा या घटनेचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

या संदर्भात AltNews ने फॅक्ट चेक केलं आहे. 


Tags:    

Similar News