मोदी सरकारवर टीका केल्याचा व्हिडिओ भाजप खासदार मनेका गांधी यांचा आहे का?
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ सोबत असा दावा करण्यात आला आहे की, ही महिला उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधील भाजप खासदार मनेका गांधी आहेत. ज्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्तिथीसाठी त्याच्याच पक्षावर टीका करत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ इंग्रजी सोबतच हिंदी कॅप्शनसह देखील शेअर केला जात आहे.
ट्विटरवर देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
काय आहे सत्य... ( What is reality)
दरम्यान, हा व्हिडिओ 30 एप्रिल 2021 रोजी पंजाबमधील 'प्रो पंजाब टीव्ही' या स्थानिक वृत्तपत्राने त्याच्या फेसबुक पेजवर पोस्ट केल्याचं आम्हाला दिसून आलं. व्हायरल व्हिडिओमध्ये या चॅनेलचा वॉटरमार्कही दिसत आहे. परंतु या व्हिडिओतील महिलेविषयी कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
11 मे रोजी पंजाब युवक काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजने सुद्धा हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये 'प्रो पंजाब टीव्ही' चा लोगो क्रॉप करण्यात आल्याचं दिसून येतं. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना कॉंग्रेसने या महिलेचे वर्णन मनेका गांधी असं केलेलं नाही.
यासोबतच, ट्विटरवर तपास केला असता, आम्हाला यूजर्सचे रिप्लाय मिळाले ज्यांनी, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला डॉली शर्मा आहे, जी गाझियाबादची काँग्रेस सदस्य आहे. यामध्ये डॉलीच्या ट्विटर हँडललाही टॅग करण्यात आलेलं आहे. मात्र, त्यांचं ट्विटर हँडल एप्रिल 2019 पासून सक्रिय नाही.
डॉली शर्मा यांनी 20 एप्रिलला त्यांच्या फेसबुक पेजवर 23 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात त्यांनी कोरोना महामारीदरम्यान, झालेल्या परिस्तिथीबद्दल भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा भाग या व्हिडिओमध्ये 14 मिनिटे 15 सेकंदांपासून सुरू होतांना दिसतो.
कोण आहेत डॉली शर्मा?
डॉली शर्मा या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गाझियाबादमधून काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचा भाजप खासदार व्ही के सिंह यांनी पराभव केला. मात्र, व्हायरल व्हिडिओमध्ये डॉली सांगतात की, त्या 36 वर्षांच्या आहेत. तर मेनका गांधी 64 वर्षांच्या आहेत. खाली डॉली आणि मेनका गांधी यांच्या फोटोची तुलना आपण पाहू शकतो.
निष्कर्ष:
एकूणच, कॉंग्रेसच्या सदस्या डॉली शर्मा यांनी सरकारवर टीका केल्याचा व्हिडिओ भाजप खासदार मेनका गांधी यांचा सांगत शेअर केला जात आहे.
या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केलं आहे.