Fact Check: "हा" व्हिडीओ खरंच युक्रेन रशिया युद्धातला आहे का?
रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. तर या युध्दासंबंधीत व्हिडीओ असल्याचा दावा करत अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये एक मुलगी एका बंदूकधारी शिपायाला बुक्की मारण्यासाठी वारंवाप हात उचलत आहे. कदाचित हा व्हिडीओ तुम्ही देखील शेअर केला असेल? मात्र, हा व्हिडीओ कधीचा आहे? तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घेण्यासाठी वाचा...;
रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. तर या युध्दासंबंधीत व्हिडीओ असल्याचा दावा करत अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये एक मुलगी एका बंदूकधारी शिपायाला बुक्की मारण्यासाठी वारंवाप हात उचलत आहे. कदाचित हा व्हिडीओ तुम्ही देखील शेअर केला असेल? मात्र, हा व्हिडीओ कधीचा आहे? तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घेण्यासाठी वाचा...
रशिया युक्रेन युध्द सुरू असून या युध्दाचे व्हिडीओ असल्याचा दावा करून अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहेत. त्यापैकीच एक मुलगी बंदूकधारी शिपायाला माघारी परतवण्यासाठी वारंवार हात उगारते. त्यामुळे शेवटी बंदूकधारी शिपाई माघारी परततो. हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तर हा व्हिडीओ ऑल इंडिया परिसंघ (AIP) ने देखील शेअर केला आहे.
@MohdZohaKhanINC यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.
NDTV ने देखील या संदर्भात वृत्त दिलं आहे.
लोकमत मराठीच्या वेबसाईटवर सखी या पेजला ही बातमी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
एशियानेटनेही एक रिपोर्ट प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये एशियानेटने "इस बच्ची का हौसला देख पुतिन भी हो जाएंगे परास्त.",असं शिर्षक आपल्या लेखाला दिलं आहे.
हा व्हिडीओ आणि त्याचे स्क्रीनशॉट शेअऱ करत अनेकांनी याचा संबंध रशिया युक्रेन युध्दाशी जोडला आहे.
काय आहे सत्य (What is reality)
व्हायरल ट्वीट च्या कमेंट मध्ये काही लोकांनी हा व्हिडीओ ९ वर्षापुर्वीचा असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गुगल वर तो शब्द टाकून शोध ( सर्च) घेतला असता युट्यूब वर २०१२ सालचा एक व्हिडीओ मिळाला. या व्हिडीओ च्या शिर्षकात सदर मुलीचं नाव अहद तमीमी असं दिलं आहे.
अहद तमीमी नावाच्या मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती इस्राइलच्या सैन्याला मारत आहे. या व्हिडीओ नंतर १६ वर्षीय अहदला ८ महिने ताब्यात घेण्यात आले होते.
अलजजीरा ने २०१८ ला अहद वर एक स्पेशल रिपोर्ट तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तिचा २०१२ चा सैनिकांसोबतचा फोटो पाहायला मिळतो. दिलेल्या माहितीनुसार अहद २०१२ ला फक्त ११ वर्षांची होती. आता हिच अहद रशियन विरोधातील लढाईंचे प्रतिक ठरली आहे. वास्तविक २०१२ ला इस्राइल सैनिकांनी अहद च्या भावाला अटक केली होती.त्यामुळे रागावलेल्या अहद ने सैनिकांवर हात उचलला होता.
निष्कर्षः एकंदरीत एक मुलगी सैनिकाला मारत असलेल्या व्हिडीओ रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ २०१२ चा आहे.
या संदर्भात Alt news ने Fact Check केले आहे. https://www.altnews.in/hindi/2012-video-from-palestinian-girl-tried-to-slap-soldier-shared-as-ukrain-russia-conflict/