Fact Check: विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा ट्वीटर यूजर पाकिस्तानी की भारतीय?

Fact Check: विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा ट्वीटर यूजर पाकिस्तानी की भारतीय?

Update: 2021-11-05 13:29 GMT

टी - 20 विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर शिवीगाळ करण्यात आली होती. शमीला लक्ष्य करण्यामागे काही पाकिस्तानी ट्वीटर अकाउंटस असल्याची चर्चा देखील झाली. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ समोर आला आणि धर्माच्या कारणावरून शमीला ट्रोल करणाऱ्यांचा निषेध केला.

Amena @criccrazygirl नावाच्या एका ट्विटर यूजरने एक पोस्ट ट्वीट केलं होतं, ज्यात युजरने विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. मात्र, हे ट्विटर हँडल आता हटवण्यात आलं आहे. तसेच, असा दावाही करण्यात येत आहे की, @criccrazygirl हे पाकिस्तानी बॉट अकाउंट आहे.

दरम्यान, आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्यांवर टीका करताना अनेकांनी हाच दावा केला आहे.


ट्वीटर अकाउंट पाकिस्तानी आहे का?

सर्वप्रथम आम्ही @criccrazyygirl च्या ट्विटच्या अर्काइव्ह लिंकचा शोध घेतला आणि अकाउंटच्या यूनिक ट्विटर आईडीचा शोध घेतला. दरम्यान, आम्हाला वेबॅक मशीनवर एक ट्वीट आढळलं, आम्ही त्या पेजचा सोर्स कोड पाहिला आणि त्याचा Unique Twitter ID '1386685474182369290' असल्याचं आढळलं.



ट्विटरवर तुम्ही तुमचं नाव बदलू शकता. मात्र, युजरनेम बदलल्यानंतरही संख्यात्मक आयडी किंवा युनिक आयडी तोच राहतो. युनिक आयडी बदलत नाही.

त्यानंतर आम्ही ट्विटरवर @criccrazyygirl चे रिप्लाय पहिले. तेव्हा आम्हाला @ramanheist वर रीडायरेक्ट करणारे काही ट्वीट आढळले. याचा अर्थ दोनही ट्वीटरचे अकाउंट एकच होते. मात्र, युजरनेम बदललेले होते.




काय आहे सत्य? What is reality?

आम्ही वेबॅक मशीनवर @ramanheist ची अर्काइव्ह ट्वीट शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार सोर्स कोड पेजवर, यूनिक ट्विटर आईडी शोधला. तेव्हा, @criccrazyygirl आणि @ramanheist यांचा एकच युनिक आयडी असल्याचं आढळलं.

खालील स्क्रीनशॉटमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.



दरम्यान, आम्हाला ट्वीटचे अर्काइव्ह लिंक देखील सापडले. ज्यात @ramanheist, NIFTY वर ट्रेडिंग करण्याबद्दल बोलत आहे. या खात्यावरून Zerodha या भारतीय वित्तीय सेवा कंपनीचा ईमेल देखील शेअर करण्यात आला होता. त्यामुळे, हे खाते वापरणारी व्यक्ती भारतातील रहिवासी असल्याचे दिसून येते.



हे लक्षात घेण्यासारखे आहे की @criccrazyygirl या वापरकर्त्याच्या नावाने अलीकडील तेलगूमधील ट्विट रिट्विट केलं गेलं आहे.


त्यामुळे, हे भारतीय खाते असल्याचे स्पष्ट होते. तसेच, या ट्वीटर यूजरच सर्वात जुनं युजरनेम @pellikututuhere हे असल्याचं देखील आम्हाला आढळलं. आणि हा एक तेलगू शब्द आहे. दरम्यान, आम्ही @pellikututuhere ला दिलेला एक रिप्लाय पहिला, जो हे सूचित करतो की, हे हँडल चालवणारी व्यक्ती हैदराबादची असावी.

दरम्यान, @criccrazyygirl ला आलेले आणखी रिप्लाय पाहिले असता, आम्हाला एक ट्विट आढळलं ज्यामध्ये वापरकर्त्याने या खात्याला प्रत्युत्तर दिलं आहे, परंतु @cricccrazyygirl चे ट्विट दिसत नाही. कारण ते खाते आता अस्तित्वातच नाही. तसेच, वेबॅक मशिनवरील रिप्लायच्या आर्काइव्ह लिंकच्या शोधात असे दिसून आले की, वेबॅक मशीनने ट्विट सेव्ह करेपर्यंत @criccrazyygirl चे वापरकर्ताचे नाव @StellaisBihp असं बदलण्यात आलं आहे.



The Wayback Machine हे देखील दाखवते की, त्या व्यक्तीने ऑप इंडिया, त्याचे CEO राहुल रोशन आणि प्रो-भाजप अकाऊंट्सचे ट्विट रिट्विट केले आहेत.
 यासोबतच, मुस्लिमविरोधी ट्विट, हिंदूंवरील ट्विट आणि भाजप समर्थक ट्विटही त्यांनी रिट्विट केलेले आहेत.

दरम्यान, खाली दिलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट अशोक श्रीवास्तव यांचा आहे. जे या वापरकर्त्याने रिट्विट केलं होतं. हे ट्वीट आर्यन खानच्या प्रकरणाबाबत होतं.

 



निष्कर्ष:

सदर व्यक्तीच्या ट्विटर अ‍ॅक्टिव्हिटीवरून तो पाकिस्तानी असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे, पाकिस्तानी बॉट अकाउंटने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीला लक्ष्य करत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा दावा खोटा आहे. तसेच, हे भारतीय ट्विटर अकाउंट आहे.


या संदर्भात Alt news ने फॅक्ट चेक केलं आहे.

https://www.altnews.in/hindi/twitter-user-giving-rape-threat-to-virat-kohlis-daughter-is-indian-not-pakistani/

Tags:    

Similar News