पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या आयएएस अधिकाऱ्याला रस्ते दुरुस्तीसाठी फोन केला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या आयएएस अधिकाऱ्याला रस्ते दुरुस्तीसाठी फोन केला? काय आहे व्हायरल दाव्याचं सत्य काय ?
6 सप्टेंबर ला ट्विटर प्रेमा लक्ष्मीनारायण यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, "त्रिपुरामध्ये तैनात असलेल्या एका IAS अधिकाऱ्याला पंतप्रधानांनी रात्री 10 वाजता फोन केला होता. ट्विटनुसार,
"21 जुलै ला रात्री 10 वाजता उत्तर त्रिपुरामध्ये तैनात आयएएस अधिकाऱ्याला फोन आला. त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की, इतक्या रात्री कोणी फोन केला. समोरून आवाज आला 'इतक्या रात्री फोन करण्यासाठी माफ करा. तुमच्या कडे बोलण्यासाठी वेळ आहे का? कारण पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचं आहे'.
ते आश्चर्याने थक्क झाले होते. आणि हळुवार आवाजाने हो म्हटले. आणि नंतर फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रान्स्फर करण्यात आला.
'रात्री उशिरा फोन केल्याबद्दल मोदींनीही त्यांची माफी मागितली. मोदी म्हणाले की, त्यांनी नुकतीच नितीन गडकरींसोबत मिटिंग केली आहे आणि त्यांना राष्ट्रीय महामार्ग 208-A दुरुस्त करायचा आहे. जो संपूर्ण देशाला त्रिपुराशी जोडतो. मात्र, या अधिकाऱ्याने यावर कशी प्रतिक्रिया दिली हे त्यांना आठवत नाही. अधिकाऱ्याला एवढंच आठवत होतं की, मोदींनी त्यांना सांगितले की, भारत सरकारने आसाम सरकार आणि त्रिपुरा सरकारशी बोलणी केली आहे आणि ते अधिकाऱ्याला संपूर्ण प्रकल्पाची देखरेख करण्यास सांगत आहेत."
पुढे व्हायरल मेसेजमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, "जेव्हा अधिकारी दुसऱ्या दिवशी कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना त्रिपुरा, आसाम सरकार आणि भारत सरकारकडून कळवण्यात आले की महामार्गाच्या 15 किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे. जेव्हा कर्मचारी कामाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा अधिकाऱ्याला तिथे 6 जेसीबी आढळले. त्या 4 दिवसांच्या आत 300 पेक्षा जास्त ट्रक मध्ये माल सुद्धा आला. तसेच, महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्याचे आभार मानण्यासाठी नितीन गडकरी यांनी त्यांना फोन सुद्धा केला होता. सोबतच, त्यांनी दिल्लीला आल्यावर अधिकाऱ्याला पंतप्रधान कार्यालयाला भेट देण्याचे आमंत्रण देखील दिले.
हा मेसेज व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
जुना दावा केला जात आहे शेअर..
दरम्यान, 27 ऑगस्ट 2016 रोजी फेसबुक पेज 'Unofficial: Subramanian Swamy' ने या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितली होती. अल्ट न्यूजचे सहसंस्थापक 'मोहम्मद जुबैर' हे फेसबुक पेज चालवतात. या संपूर्ण प्रकरणामध्ये केल्या जाणाऱ्या दाव्यांचे वास्तव या एका लेखात केले गेले आहे.
सर्वप्रथम द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट पाहूया. 28 ऑगस्ट 2016 चा हा रिपोर्ट आहे.
ज्यामध्ये इंडियन एक्सप्रेस टीमच्या हवाल्याने लिहिण्यात आलं होतं की, ते या व्हायरल दाव्याची पुष्टी करत नाहीत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, हा मेसेज बीजीपी आयटी सेलचे सदस्य पुष्पक चक्रवर्ती यांनी Quora वर पोस्ट केला होता. तसेच अनेक सोशल मीडिया युजरने हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, इकॉनॉमिक टाइम्सच्या एका पत्रकाराने त्रिपुराच्या अधिकाऱ्यालाही या दाव्याबद्दल विचारले होते. मात्र, त्यांनी नकार दिला. तर दुसरीकडे बीजेपी आयटी सेलचे सदस्य पुष्पक यांना विचारले असता ते म्हणाले
"मी कोणत्या अधिकाऱ्याबद्दल बोलत होतो हे पत्रकारांना कसे कळले? मी पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नव्हते."
याचं कारण विचारलं असता ते म्हणाले?
त्यांनी पोस्ट करत सांगितले होते की, त्यांनी पोस्टमध्ये अधिकाऱ्याचे नाव जाणूनबुजून लिहिले नाही. कारण त्याबद्दल जाहीरपणे बोलणे प्रोटोकॉलच्या विरोधात आहे.
पत्रकार अमन शर्मा यांनी २७ ऑगस्ट २०१६ रोजी ट्विट केलं आहे. ते म्हणतात....
"उत्तर त्रिपुराचे जिल्हाधिकारी संदीप महात्मे यांनी पंतप्रधानांचा फोन आल्याचा दावा फेटाळला होता."
मात्र, बिझनेस स्टँडर्डचे पत्रकार अरिंदम मजुमदार यांनी या ट्विटला उत्तर देताना सांगितले होते की, काही स्थानिक माध्यमांच्या पत्रकारांनी पंतप्रधान मोदींचा फोन आल्याची पुष्टी केली होती. यावर अमन शर्मा यांनी पुन्हा सांगितले की, हा दावा अधिकाऱ्यांनीच नाकारला आहे.
The official laughed and refused to discuss the issue ;)
— Arindam Majumder (@ari_maj) August 27, 2016
2016 दरम्यान त्रिपुरामध्ये राष्ट्रीय महामार्गाची स्थिती काय होती?
31 जुलै 2016 च्या इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये, त्रिपुरा मधील 2 महामार्ग पावसामुळे बंद झाले होते. ज्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता. तसेच विरोधकांनी आणि सामान्य लोकांनी याबद्दल आंदोलनं देखील केली. यामुळेच राज्याने राष्ट्रीय महामार्ग 44 ची दुरुस्ती केली. आणि आसाम आणि त्रिपुरा दरम्यानचा रस्ता खुला झाला.
रिपोर्टमध्ये उत्तर त्रिपुराचे डीएम महात्मे यांचा हवाला देत म्हटलं आहे की,
एनएचआयडीसीएलने NHIDCL राज्याला 50 लाख रुपये दिले आहेत. यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम 6 दिवसातच संपले. परंतु राज्याचा मुख्य रस्ता असलेल्या क्रमांक 8 ची अवस्था अजूनही खराबच होती. यासाठी वारंवार मागण्य़ा करूनही हा रस्ता ठीक झाला नव्हता.
यासोबतच, एनएचआयडीसीएलने १ जुलै ला महामार्गाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली होती. या निविदेत महामार्गाचा 18 किमी भाग लवकरात लवकर दुरुस्त करा असं सांगण्यात आलं होतं.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, PWD ने NH 8 ची दुरुस्ती सुरू केली आहे. मात्र, या रिपोर्टमध्ये, कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांनी DM ला फोन केल्याचा उल्लेख नव्हता.
NH-8 आणि NH-208 (A) च्या दुरुस्तीचे काम
1 ऑगस्ट, 2016 च्या एका बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, त्रिपुरा चा PWD, NH-8 आणि NH-208 (A) ची दुरुस्ती करण्यासाठी NHIDCL (नॅशनल हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) मदत करत होता. या संदर्भात मुख्य अभियंता दीपक दास यांनी माहिती दिली. जे नॅशनल हायवेचे इन्चार्ज देखील होते. , सप्टेंबरमध्ये पाऊस संपताच दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल.
दरम्यान, या प्रकरणात नवी भूमिका घेत 30 जुलै 2016 ला एबीपी माझाचा एक रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये त्रिपुराच्या PWD मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.
राज्य सरकारने केंद्र सरकार आणि आसाम सरकारला लिहिलेली पत्रं दाखवली. आणि सांगितले, केंद्र सरकार त्रिपुराच्या लोकांना मदत न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकूणच, 2016 मध्ये भाजप आयटी सेलच्या एका सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अधिकाऱ्याला फोन केल्याचा दावा केला आहे. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने या बाबीची पुष्टी केली नाही. या संदर्भात alt news ने वृत्त दिलं आहे.