Fact Check : जंतर-मंतर वर धीरेंद्र शास्त्री आणि सुरेश चव्हाणकेच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांच्या तोंडी कत्तलीची भाषा
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुदर्शन टीव्हीचे सुरेश चव्हाण के आणि धीरेंद्र शास्री यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता. यावेळी या मोर्चात कत्तल करण्याची जहरी भाषा वापरण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यामध्ये तथ्य आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक
५ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्लीतल्या जंतर-मंतरवरील २ कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांमध्ये खुलेआम मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. पहिल्या कार्यक्रमाचं नाव ‘सनातन धर्म संसद’ असं होतं, या कार्यक्रमाचं आयोजन बागेश्वर धाम च्या धीरेंद्र शास्त्री यांच्या समर्थनार्थ करण्यात आलं होतं. दुस-या कार्यक्रमाचं नाव ‘हिंदु आक्रोश प्रदर्शन’ असं होतं. सुदर्शन न्यूज चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या समर्थनार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमाला गर्दी व्हावी यासाठी गुरूकुल मधून मुलांना बोलावण्यात आलं होतं. या मुलांसमोर व्यासपीठावरून द्वेष पसरवणारी चिथावणीखोर भाषणं देण्यात आली. ‘धर्म संसद’ या नावाखाली दुस-या धर्मातील लोकांची कत्तल करणे आणि अपशब्दांचा वापर करण्यात आला.
‘सनातन धर्म संसदे’त द्वेषपूर्ण भाषणं
या संसदेत मोठ्याप्रमाणावर साधु-संत आणि हिंदु संघटनांच्या लोकांनी धीरेंद्र शास्त्री ला Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली होती. याशिवाय रामचरितमानस या ग्रंथाला ‘हिंदु राष्ट्र’ भारताचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करून गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची मागणीही यावेळी सनातन धर्म संसदेत करण्यात आली. धीरेंद्र शास्त्रीच्या समर्थनार्थ इथं आलेल्या महामंडलेश्वर हरी सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्या त्यांचं वय ८३ वर्ष असून त्यांनी आतापर्यंत ८० लोकांना मारून टाकलंय. पुढे जाऊन सिंह म्हणाले की, १०० लोकांना मारल्यानंतरच ते स्वतः मरणार आहेत. सिंह यांनी सार्वजनिकरित्या मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना मारण्यासाठी लोकांना उत्तेजित केलं. त्याचवेळी हरी सिंह यांनी लोकांना स्वतःसोबत शस्त्र बाळगण्याचं आवाहनही केलं.
हरी सिंह पुढे म्हणाले, ख्रिश्चन म्हणतात तोडा आणि राज्य करा, मुस्लिम म्हणतात मारो-काटो – अरे भाई तुम कब मारो काटोगे, जब तुम मर जाओगे ? कब मारोगे ? अरे ईसाई मुसलमानों को कब मारोगे ? अरे तुम्हारे पास क्या है जो मारोगे ? इतनी सी चाकू है जिससे सब्जी काटते हो. उस चाकू से कुछ नहीं होनेवाला है, हथियार रखो !”
याच व्हिडिओमध्ये हरी सिंह ने पत्रकार नीरज झा याने विचारलेल्या एका प्रश्नावर दिलेलं उत्तर असं की, आम्ही प्रेमाची गोष्ट करतो. आमच्यासाठी तरी पूर्ण विश्व एकच आहे”. यावेळी पत्रकार झा म्हणाला की, तुम्ही तर गोळ्या घालण्याची गोष्ट करता ? उत्तरात हरी सिंह म्हणाले, बिल्कुल गोळ्या घातल्या पाहिजे. जो आमच्या धर्म, सुना, मुली, गाय आणि ग्रंथांचा अपमान करेल, आमच्य मंदिरांना तोडेल, त्यांना तर मारूनच टाकलं पाहिजे, सोडलं नाही पाहिजे”. त्याचवेळी उपस्थितांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणा दिल्या. स्वामी प्रसाद मौर्या असो, बिहारचे शिक्षण मंत्री असो या सर्व देशद्रोह्यांना देशाबाहेर काढून सीमेवर नेऊन उभा करून गोळ्या घाला”
आणखी एका व्हिडिओत हरी सिंह स्वतःला आखाड्याशी संबंधित सांगतात. सिंह म्हणतात, आमचा कुणीही जो हिंदु आहे, तो आमच्या हिंदु मानबिंदुची रक्षा करू इच्छित नाही, त्याला हिंदु म्हणत नाहीत. आमचे मठ, मंदिर, सुना, मुली, घोडे, साधू-संत, वेद, शास्त्र-पुराण यांचं जो कुणी नुकसान करेल...त्याला फासावर लटकवलं पाहिजे आणि दुसरी शिक्षा म्हणजे चौकात लटकवून सार्वजनिकरित्या गोळ्या घातल्या पाहिजे
हरी सिंह म्हणतात, जो गाय कापून खातो, तो तुम्हांलाही कापून खाईल. ३६ कोटी देव-देवता गायीत असतात. आणि सुर्योदयापूर्वी सुमारे दीड लाख गोवंश निधर्मी ईसाई-मुस्लिमांकडून कापले जातात. आणि ते गायीला खातात ज्यात आमचे देव-देवता असतात. जी आमच्या सनातन धर्माला मान्य नाही. गाय अर्थव्यवस्थेचा मापदंड आहे. लोकांचं निदान करणारी लॅब आहे”.
धर्म संसदेत सामिल झालेले हरियाणा भाजपचे मुख्य माध्यम समन्वयक आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमू ने म्हटलं की, “देश हिंदु राष्ट्र होता, आहे आणि राहिल. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी पाकिस्तान किंवा बांग्लादेशला निघून जावं”. पुढे अमू म्हणतात की, “ हे हिंदु राष्ट्रचं आहे. पत्रकार नीरज झा यांनी प्रश्न विचारला की, भारतीय राज्यघटना तर म्हणते की हे हिंदुराष्ट्र नाहीये. त्यावर अमू म्हणतात, राज्यघटना काय म्हणते ते तुम्ही पाहा. माझ्या मते, हे हिंदुराष्ट्र होते आणि आहे. मुगल गेले, इंग्रज गेले त्यामुळं हे हिंदुराष्ट्रच आहे”.
‘हिंदु आक्रोश प्रदर्शन’ मध्ये द्वेषपूर्ण भाषणं
सुदर्शन न्यूज ने ५ फेब्रुवारी ला त्यांचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढण्यात आला, हा मोर्चा त्यांच्याच चॅनेलवर दोन तास ब्रॉडकास्टही करण्यात आला होता. यावरही सूरजपाल अमू ने उपस्थित गर्दीला प्रश्न विचारत म्हटलं की, सुरेश चव्हाणके यांना कुणी हात लावेल तर तुम्ही त्याला सोडाल का ? सुरेश चव्हाणके ला कुणी छेडेल तर त्याला तुम्ही सोडणार का ? हिंदु राष्ट्र बनविण्यापासून आम्हांला कुणी रोखणार असेल तर त्यांना तुम्ही सोडणार का ? ईट से ईट बजा दोगे या नहीं. सुरेश चव्हाणके एकटा नाहीये, भारताचे सव्वा कोटी नागरिक चव्हाणके सोबत आहेत. सुरेश चव्हाणके काही गाजर-मुळी नाही त्याला उखडून खाऊन टाकले जाईल. सुरेश चव्हाणके याला जर कुणी रोखलं तर त्यांना आम्ही पाहून घेऊ...मी तुम्हांला आग्रह करतो की, आम्ही काही मागत नाही आहोत, आम्ही तर त्या देशद्रोह्यांना भारताबाहेर काढण्याची मागणी करतोय, जे हिंदुस्थानचं खातात आणि पाकिस्तानचं गुणगान करतात”.
हा संवाद तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओवर २५ मिनिटांपासून पुढे ऐकू शकता.
याच व्हिडिओमध्ये ४० मिनिटांपासून पुढे गौरक्ष बीज चे करण जी महाराज म्हणतात, “ कुणीही जर चव्हाणके यांना हात लावला तर तो मुळापासून काढून टाकू...या मुस्लिमांना घाबरण्याची गर नाही. मुसलमान या शब्दाचा अर्थ सांगतो, जो मुसळीचा मार खाऊन मान्य करेल तो मुसलमान आहे...एक जेहादी आमच्या बहिण, मुलीसोबत लव जिहाद करतो आपला समाज मौन पाळतो आणि म्हणतो, आमची मुलगी होती, तिचा आम्ही त्याग केला. अरे काय त्याग केला. अरे त्या जिहादीच्या घरात घुसून त्याच्या कुटुंबियांचा सोक्षमोक्ष लावा...यापुढे कुणी असं कृत्य करणार नाही. त्याच्या घरी जा..माहिती झालं पाहिजे की एका हिंदु मुलीला आमिष दाखवून नेल्यावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात...ते आम्हांलाच बघितले पाहिजे की काय करायला पाहिजे ते...हे न्यायालयात चालेल, ते चालेल, रिलेशनशिप चालेल त्याने काहीही होणार नाही. आम्हाला पुढे यावच लागेल. आम्हांला बघावं लागेल काय करायचं, काय नाही करायचंय”.
देवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बृजभूषण सैनी म्हणतात, “ मित्रांनो, आता वेळ आलेली आहे. या भारताला पुन्हा सनातन राष्ट्र बनविण्याची. १९४७ मध्ये भारताची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती. मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांग्लादेश मिळालं. मात्र, आम्हा हिंदुंना एक धर्मनिरपेक्षा राष्ट्र मिळालं. त्यावेळच्या नेत्यांनी आम्हा हिंदुंसोबत विश्वासघात केला. त्याचवेळी भारताला हिंदुराष्ट्र घोषित केलं पाहिजे होतं. मात्र, तसं झालं नाही. आता हे आमचं कर्तव्यं आहे की, आपण सगळ्यांनी मिळून या भारताला सनातन राष्ट्र बनवण्याच्या दिशेनं आपलं महत्त्वाचं योगदान दिलं पाहिजे”.
सुरेश चव्हाणके यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी २०२१ पासून एक खटला सुरू आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हिंदु युवा वाहिनीद्वारे आयोजित एका कार्यक्रमात चव्हाणके यांनी ते वादग्रस्त भाषण दिलं होतं. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायाधीश पीएस नरसिम्हा यांच्या पीठानं तपास अधिका-यांना दोन आठव्यात याप्रकरणाची तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चव्हाणके यांनी हिंदु संघटनांकडे समर्थकांची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून ५ फेब्रुवारी रोजी जंतर-मंतर इथं जमलेल्या गर्दीत पुन्हा द्वेषपूर्ण भाषणं देण्यात आली.
जंतर-मंतरवर गर्दी कशी जमली ?
4 फेब्रुवारी ला बागेश्वर धाम च्या ट्विटर हँडवरून एक पोस्टर ट्विट करण्यात आलं. त्यात लिहिलं होतं की, “पहुंचो जंतर-मंतर बागेश्वर धाम महाराज जी के समर्थन में” या कार्यक्रमाला ‘सनातन धर्म संसद’ असं नाव देण्यात आलं होतं. रविवारी ५ फेब्रुवारी वेळ सकाळी १० वाजता”
यानंतर दिल्लीच्या जंतर-मंतर वर बागेश्वर धाम च्या धीरेंद्र शास्त्री यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली. या कार्यक्रमाचे आयोजन बालाजी धाम शिष्य मंडळ, दिल्ली च्या प्रदीप खटकड यांनी केलं होतं. ऑल्ट न्यूज ने पोस्टरवर दिलेल्या मोबाईल नंबर दोन-तीन वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
याच पद्धतीनं सुदर्शन न्यूज चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी ३ फेब्रुवारी ला एक पोस्टर शेअर करत लोकांना समर्थनाचं आवाहन केलं होतं. आणि ५ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता लोकांनी जंतर-मंतरवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं.
म्हणजेच, या दोन्ही कार्यक्रमांना धीरेंद्र शास्त्री आणि सुरेश चव्हाणके यांच्या आवाहनावरूनच गर्दी जमवण्यात आली होती. आणि याच ठिकाणी आलेल्या लोकांनी दुस-या धर्माच्या लोकांविरोधात विष पसरवण्याचं काम केलं.
दुर्देव हे की, दिल्ली पोलिसांनी या प्रक्षोभक भाषणांविरोधात कुठलीही कारवाई केली नाही. मात्र, याचे वृत्तांकन करणा-या ‘मॉलिटिक्स’ या चॅनेललाच पोलिसांनी नोटीस दिली. दिल्ली पोलिसांनी ही नोटीस मॉलिटिक्सच्या ट्विटवर रिप्लाय म्हणून दिली.
या नोटिशीत लिहिलंय की, “ तुम्ही आपत्तीजनक, प्रक्षोभक पोस्ट कऱण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहात. नवी दिल्ली च्या सायबर पोलिसांनी त्यासाठीच तुम्हांला सीआरपीसी कलम १४९ नुसार नोटीस बजावलेली आहे. ही नोटीस कायदा व सुव्यवस्था न बिघडवण्यासाठी दिलेली आहे. त्यामुळं यापुढे आपण असं करू नये, हे या नोटिशीद्वारे बजावण्यात येत आहे. जर तुम्ही याचे पालन केले नाही तर कायदेशीरित्या तुम्ही शिक्षेस पात्र असाल”
— DCP New Delhi (@DCPNewDelhi) February 6, 2023
दिल्ली पोलिसांच्या या नोटिशीवर मॉलिटिक्स ने पण उत्तर दिलं. मॉलिटिक्स ने लिहिलंय, हे वाचून बरं वाटलं की, दिल्ली पोलिसही प्रक्षोभक भाषणांच्या विरोधात आहे. मात्र, हे दुःखद आहे की, प्रक्षोभक भाषणं देणा-यांऐवजी दिल्ली पोलीस आमच्या संस्थेला नोटीस पाठवते”.
दिल्ली पुलिस द्वारा हमें भेजे गए नोटिस पर हमारा आधिकारिक बयान#MoliticsReports : pic.twitter.com/SP9xnfnkO8
— Molitics (@moliticsindia) February 6, 2023
ऑल्ट न्यूज ने दिल्ली पोलिसांशी यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. मात्र, ही नोटीस जारी करणारे पोलीस निरीक्षक विजय पाल सिंह यांनी न्यूजलॉन्ड्री या न्यूजपोर्टलला सांगितले की, होय, मीच ती नोटीस बजावली आहे, मात्र मी याविषयी काहीही बोलणार नाही, मला यावर बोलण्याची परवानगी नाहीये”.
असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. २०२१ मध्ये जंतर-मंतर वर BJP चे नेते अश्विनी उपाध्याय यांच्या नेतृत्वात सार्वजनिकरित्या मुस्लिमांचा नरसंहार कऱण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. डिसेंबर २०२१ मध्ये उत्तराखंड मध्ये यति नरसिंहानंद सरस्वती द्वारा आयोजित एका ‘धर्म संसद’ मध्ये ही मुस्लिमांना कापून टाकण्याची भाषा करण्यात आली होती. अलिकडेच ऑल्ट न्यूज ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्यामध्ये, टी राजा सहित BJP च्या अन्य नेत्यांनी ‘हिंदु जन आक्रोश मोर्चा’ नावानं काढलेल्या मोर्चातही मुस्लिमांच्या विरोधात हिंसा करण्याचं आवाहन करत आहेत”.