FACTCHECK :‘द कश्मीर फ़ाइल्स’ चित्रपटाला दादासाहेब फाळके अवॉर्ड नाही तर खाजगी संस्थेचे अवॉर्ड मिळालं

Update: 2023-02-24 02:03 GMT

मुंबई येथे पार पडलेल्या "दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023" मध्ये वरुण धवन, रणवीर कपूर, आलिया भट्ट, ऋषभ शेट्टी यांच्यासह "द काश्मीर फाइल्स” या चित्रपटाचा त्याच बरोबर अनेकांचा गौरव करण्यात आला.

‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळाला. या निमित्ताने चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ट्वीट करत आभार मानले. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर ट्वीट केले. की या पुरस्काराचे श्रेय सर्व दहशतवाद पीडितांना आणि भारतातील सर्व लोकांना ज्यांचे चित्रपटाला आशीर्वाद मिळाले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याची टीकाही झाली होती. विवेक अग्निहोत्री यांनी या ट्विटमध्ये #DadaSahebPhalkeAwards2023 चा वापर केला आहे. आणि येथूनच दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

दादासाहेब फाळके अवॉर्ड

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके, यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. भारतातील फुल-लेंथ फ़ीचर फ़िल्म राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 1913 रोजी दिग्दर्शित केला. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या भारतीय चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने 1969 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी आणि विकासात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान दिला जातो. स्वर्ण कमल (सुवर्ण कमळ) पदक, शाल आणि 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आणि हा पुरस्कार देशातला सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार म्हणून कलाकारांना दिल जातो.

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड

(Dadasaheb Phalke International Film Festival) च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा खाजगी संस्थेद्वारे आयोजित केलेला स्वतंत्र चित्रपट महोत्सव आहे. अनिल मिश्रा हे या चित्रपट महोत्सवाचे संस्थापक आणि दिग्दर्शक आहेत. 2012 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचा वारसा पुढे नेण्यासाठी या मोहोत्सवाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 2016 मध्ये या मोहोत्सवाला सुरवात झाली. नावात साम्य असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. चित्रपट संशोधक आणि समीक्षक ब्रह्मत्मज यांनी ट्विट केले की, संस्थेद्वारे आयोजित केलेला हा पुरस्कार भारत सरकारच्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या समतुल्य मानला जात आहे. ते थांबवण्याची भारत सरकारला त्यांनी विनंती केली.

दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर म्हणाले..

2022 मध्ये अमर उजाला ला दिलेल्या मुलाखतीत दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर म्हणाले होते की, मुंबईत वितरित होणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात लोकांनी त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. ज्यांची क्षमता नाही अशा लोकांना पैसे घेऊन हा पुरस्कार दिला जात असल्याचे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी सांगितले की, त्यांना एकदा एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा फोन आला की त्यांना अमेरिकेतील दादासाहेब फाळके पुरस्काराचे आयोजक सापडले आहेत, जो पुरस्कारासाठी दहा लाखांची मागणी करत आहे...

ते म्हणाले, मला हे पाहून वाईट वाटते. की एकीकडे अमिताभ बच्चन यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला दादासाहेब फाळके अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले जाते, तर दुसरीकडे मुंबई मध्ये रक्कम देऊन हा पुरस्कार घेऊन निघून जातात. मुळात त्याच नाव दादासाहेब फाळके पुरस्कार असा आहे त्या वर मला जास्त वाईट वाटत. अमर उजाला या मुलाखतीत चंद्रशेखर पुसाळकर यांनी भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारासारख्या पुरस्कारांच्या नावावरही आक्षेप घेतला. दादासाहेब फाळके यांच्या नावाने लोक दुकाने चालवतात तेव्हा त्रास होतो, असेही ते म्हणाले.

दादासाहेब फाळके यांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत हे तुम्हाला माहिती तरी आहेत का? उदाहरणार्थ – दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार, दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार, दादासाहेब फाळके उत्कृष्टता पुरस्कार, दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार इत्यादी. 2018 मध्ये आयएएनएस (Indo-Asian News Service) दिलेल्या मुलाखतीत पुसाळकर म्हणाले होते की, 2015 नंतर मतभेदांमुळे दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कारातून आणखी दोन भाग तयार झाले आहेत. काही लोकांनी दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन अवॉर्ड्स सुरू केले आणि त्यानंतर काहींनी दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड्स सुरू केले. मी तिन्ही पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहत होतो कारण ते आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करायचे, पण मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एका छताखाली यावे. एकत्रित मिळून काम करावे.

यापूर्वीही दादासाहेबांच्या नावाने चालणारे अनेक पुरस्कार वादांच्या भोवऱ्यात सापडले होते. भारतीय जनता पक्षाचे सचिव आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे सदस्य वाणी त्रिपाठी टिकू यांनी 2018 मध्ये एका ट्विटमध्ये लिहिले होते की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केवळ एकच 'दादासाहेब फाळके' पुरस्कार स्थापित केला आहे. इतर कोणीही नाव वापरणे हे या प्रतिष्ठित पुरस्काराचे आणि नावाचे घोर उल्लंघन आहे.

'द काश्मीर फाइल्स' या वादग्रस्त चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, 2023 मध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून 'द काश्मीर फाइल्स ' या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या ट्विटमध्ये #DadaSahebPhalkeAwards2023 चा वापर केला आहे. आणि येथूनच दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

'द काश्मीर फाइल्स'ला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचे अनेक मीडिया आउटलेट आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. पण इथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार हे दोन वेगळे पुरस्कार आहेत.

आता या दोन पुरस्कारांमधील फरक नक्की काय ?

दादासाहेब फाळके पुरस्कार आणि खाजगी संस्थांद्वारे त्यांच्या नावावर दिले जाणारे पुरस्कार यातील सर्वात मोठा फरक म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्काराला कोणतीही श्रेणी नाही म्हणजेच सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इ. श्रेणी अस्तित्वातच नाहीत. दादासाहेब फाळके हा पुरस्कार एका वर्षात भारतीय चित्रपट सृष्ठीत , उद्योगात अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला दिला जातो.

विवेक अग्निहोत्री यांच्या वादग्रस्त विधाना नंतर अनेक ट्वीट वापरकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतीक सिंन्हा यांनी ट्वीट करून म्हणाले की, विवेक अग्निहोत्री यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात कश्मीर फाईल्सने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकल्याचे ट्विट दिशाभूल करणारे आहे. या चित्रपटाला फाळके यांच्या नावाच्या फेस्टमध्ये पारितोषिक मिळाले परंतु प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार नाही, ज्याप्रमाणे तो ऑस्करसाठी निवडला गेला नव्हता.

ललंन पोस्ट यांनी ट्वीट केला आणि म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स’ को मिला ‘नकली’ दादासाहेब फाल्के अवार्ड! दादा साहब के नाती ने कहा- पैसा लेकर बांटा जा रहा पुरस्कार

मोहम्मद जुबेर यांनी ट्वीट करून सांगितले की, विवेक अग्निहोत्री यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात कश्मीर फाईल्सने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकल्याचे ट्विट करून जनतेची दिशाभूल केली आहे. या चित्रपटाला फाळके यांच्या नावाच्या फेस्टमध्ये पारितोषिक मिळाले परंतु प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार नाही, त्यामुळे हा चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेला नाही

विवेक अग्निहोत्री यांनी हे प्रकरण झाल्या नानंतर ट्वीट करून माफी मागितली ते म्हणाले की, मला माफ करा पण #TheKashmirFiles ने खरंच तुमच्या जिहादी माफियांचा पर्दाफाश केला आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला जगावे लागेल. कृपया त्याला सामोरे जाण्यास सक्षम व्हा. मी तुमच्यासारख्या विद्वानाना दोष देत नाही कारण तुम्ही ट्रॉफीवर काय लिहिले आहे ते वाचू शकत नाही. फेक न्यूजसह सर्व शुभेच्छा.

तथ्य तपासणी


एकूणच, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार यात खूप फरक आहे. विवेक अग्निहोत्री यांनी दावा केला आहे की 'द काश्मीर फाइल्स' ला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे, त्यांच्या ट्विटमध्ये दिशाभूल करणारे हॅशटॅग वापरल्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2023 मध्ये 'द काश्मीर फाइल्स' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे, जो एका खाजगी संस्थेने आयोजित केलेला एक स्वतंत्र चित्रपट महोत्सव आहे. याबाबतीत अनेक ट्वीट वापरकर्त्यांनी त्यांच्या ट्वीट वर नकली अवॉर्ड म्हणून प्रतिक्रिया दिली. 

Tags:    

Similar News