Fact Check: अशरफ घनी यांनी देश सोडण्यापूर्वी तालिबान नेत्याला मिठी मारली? भारतीय माध्यमांनी चालवलेल्या वृत्ताची सत्यता काय?
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे सुद्धा देश सोडून पळून गेले. या दरम्यान, अशरफ घनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अशरफ घनी एका व्यक्तीला मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो अशरफ घनी यांनी देश सोडण्यापूर्वी तालिबानच्या नेत्यांना मिठी मारतानाचा आहे. असं म्हणत शेअर केला जात आहे.
TV9 भारतवर्षने देखील हा फोटो एका कार्यक्रमादरम्यान चालवला होता. व्हिडिओमध्ये अँकर सांगत आहे की, अब्दुल घनी यांनी तालिबान नेत्यांना मिठी मारली. दरम्यान, अँकर निशांत चतुर्वेदी यांनी कार्यक्रमात सामील असलेल्या लोकांना प्रश्न विचारला की, त्यांनी भीतीपोटी मिठी मारली आहे किंवा कोणी खूप जुना मित्र आहे.
नॅशनल हेरल्डनेही असाच दावा करत हा फोटो शेअर केला आहे.
तसेच "जनता का रिपोर्टर" या ट्विटर हँडलवरून सुद्धा हा फोटो याचं दाव्यासह शेअर केला गेला आहे.
Afghan President Ashraf Ghani hugs Taliban leader. He may hand over the power soon before leaving the country. Extraordinary developments taking place in #Afghanistan #Taliban pic.twitter.com/hDtmyLe6Mp
— Janta Ka Reporter (@JantaKaReporter) August 15, 2021
टाईम्स ऑफ इस्लामाबादच्या रिपोर्टमध्ये सुद्धा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. पत्रकार आणि इतिहासकार विजय प्रसाद यांनीही असाच दावा करत हा फोटो ट्विट केला आहे.
काय आहे सत्य...?
दरम्यान, व्हायरल होणाऱ्या फोटोवर उत्तर देत एका यूजरने एका फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या फेसबुक पोस्टच्या स्क्रीनशॉटमध्ये हा फोटो १ मार्च २०२० ला पोस्ट केल्याचं दिसून येत आहे. तसेच हा फोटो ईदच्या कार्यक्रमादरम्यानचा असल्याचं सुद्धा समजतं.
की वर्ड सर्च केले असता आम्हाला टोलो न्यूजचा एक व्हिडिओ सापडला. दरम्यान, 12 ऑगस्ट 2019 च्या या व्हिडिओमधील अशरफ घनी यांच्या पगडीचा पॅटर्न व्हायरल होणाऱ्या फोटोमधील पागडी सारखाच आहे. मात्र, निश्चित काही सांगता येत नाही.
यासोबतच, टोलो न्यूज आणि इतर काही ट्विटर अकाउंट्सने ऑगस्ट 2019 च्या ईदचे फोटो ट्विट केले होते. त्या फोटोंमधील, अशरफ घनींचे कपडे आणि व्हायरल होणाऱ्या फोटोमधील त्यांचे कपडे सारखेच आहेत.
दरम्यान, न्यूज मोबाइलने देखील या फोटोबाबत सत्य पडताळणी रिपोर्ट केला आहे. तसंच Alt news हे फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/hindi/old-image-of-former-afganistan-president-ashraf-ghani-shared-as-he-hugged-talibani-leader-before-leaving-country/
निष्कर्ष
एकूणच, व्हायरल होणार फोटो हा अशरफ घनींनी देश सोडण्यापूर्वीचा नाही हे निश्चित आहे कारण हा फोटो २०२० चा असल्याचं पडताळणी करतांना समोर आलं आहे.