Fact check : गुजरातमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांचा व्हायरल व्हिडीओ खरा आहे का?

Update: 2021-12-28 05:58 GMT

गुजरातमध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत. पण या निवडणुकीतील विजयानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात पाकिस्तान जिंदाबादचा नारा देत असल्याचा दावा केला जात आहे, तो खरा आहे का? सत्यता जाणून घेण्यासाठी वाचा...

गुजरातमधील कच्छच्या दुधई गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाच्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. न्यूज 24ने ट्वीट करून गुजरात राज्यातील कच्छच्या दुधई ग्रामपंचायत निवडणूकीच्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या असल्याचे म्हटले आहे. (Tweet Archive)


 



गुजरातमधील स्थानिक माध्यमांनी ही बातमी प्रसिध्द केली. तर VTV गुजरातने हा दावा त्यांच्या लेखातून शेअर केला आहे. तर वाईब्स ऑफ इंडिया वेबसाईटने हा दावा शेअर केला आहे.






 



 



 



ट्वीटर आणि फेसबुकवर देखील हा व्हिडिओ भारतविरोधी घोषणा दिल्या असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे.




 


पडताळणी

व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकल्यानंतर त्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर या व्हिडीओमध्ये कच्छच्या दुधई गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी रॅलीत कार्यकर्ते काही घोषणा देत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत रीनाबेन कोठीवाड यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत परंपरेप्रमाणे रीनाबेन यांचे पती राधुभाई यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. मात्र या व्हिडीओत कोठीवाड यांचे नावही ऐकायला येत नाही. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता पडताळणी करण्याचे काम अल्ट न्यूजने सुरू केले.

या व्हिडीओची सत्यता पडताळत असताना गुजराती दैनिक भास्करचा अहवाल मिळाला. या अहवालामध्ये असे सांगण्यात आले आहे की, कच्छच्या अंजार जिल्ह्यातील दुधई गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली होती. त्याचा व्हिडीओ शेअर करत पाकिस्तान जिंदाबादचा खोटा दावा शेअर केला जात आहे, पोलिसांनीही दावा खोटा असल्याचे सांगितले. तर व्हिडीओबाबत एसपी मयुर पटेल यांनी सांगितले की त्यामध्ये राधुभाई जिंदाबाद अशा घोषणा देण्यात येत होत्या.




 


पूर्व कच्छचे एसपीए मयुर पटेल यांनी ट्वीट करून हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तर त्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबाद नाही तर राधुभाई जिंदाबाद अशी घोषणा लोक देत होते.

याव्यतिरीक्त अल्ट न्यूजने एसपी मयुर पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने सांगितले की, दुधई गावात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या नाही, तर कार्यालयातील कर्मचाऱ्याने एसपी मयुर पटेल यांचा एक व्हिडीओ पाठवला.

https://vimeo.com/659709021

निष्कर्ष

निवडणूक प्रचार वा निवडणुकीच्या विजयी रॅलीत राधुभाई जिंदाबाद या घोषणेला पाकिस्तान जिंदाबाद नावाने शेअऱ करून खोटा प्रचार केला जात होता. मात्र अल्ट न्यूजने त्याची पडताळणी केली असता ती घोषणा राधुभाई जिंदाबाद अशीच होती, असे निदर्शनास आले.

Tags:    

Similar News