Fact Check: शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीला हजर होते? काय आहे व्हायरल फोटोची सत्यता?

Fact Check शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीला हजर होते? काय आहे व्हायरल फोटोची सत्यता? Sharad Pawar Amit Shaha & Devendra Fadnavis meeting photo goes viral; What is photo reality;

Update: 2021-11-27 06:02 GMT

मार्च महिन्यात राज्यात भाजपचे सरकार येणार असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेला असताना दुसरीकडे शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहे.

चंद्रकांत पाटील 4 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे सर्व काम सोडून दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यात शरद पवार देखील आपले नियोजीत दौरे सोडून दिल्लीला गेल्याच्या चर्चा माध्यमांवर रंगल्या. आणि त्यातच शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

काय आहे सत्य?

आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या फोटोची पोलखोल केली आहे.

हा आहे #BJP IT cell चा फर्जीवाड़ा,

याच फर्जीवाड्याचा आधार घेत केंद्रीय मंत्री मार्च महिन्यात सरकार बनवण्याचा दावा करत आहेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरुन देखील हा फोटो ट्वीट केला आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या 'गजाल्या' सुरू झाल्यात. त्यासाठी 'असले' मॉफ़् केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉफ़् ला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. @MahaCyber1 असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.

असं ट्वीट NCP च्या अकाउंटवरुन करण्यात आलं आहे.

एकंदरीत दोनही फोटो पाहिले असता शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमधील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची स्पष्टता शरद पवार यांच्या फोटोपेक्षा अधिक आहे. त्यामुळं हा फोटो मॉर्फ केलेला असल्याचं स्पष्ट होते.

शरद पवारांचा मुळ फोटो कुठला?

शरद पवार यांनी 12 नोव्हेंबरला त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत त्यांनी इस्रायलच्या अधिकाऱ्याची भेट घेतल्याची माहिती देतात.




याच फोटोमधील शरद पवार यांचा हा फोटो घेऊन सदर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोशी जोडला आहे.

निष्कर्ष: अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमधील शरद पवार यांचा फोटो मॉर्फ करण्यात आल्याचं यावरुन स्पष्ट होते.

Tags:    

Similar News