पाकिस्तानच्या झेंड्यासोबत रिहानाचा फोटो काय आहे सत्य?

Update: 2021-02-06 14:44 GMT

अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने (Rihanna) शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर तिची स्तुती आणि तिला ट्रोलही केलं जात आहे. तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट करून तिला ट्रोल करण्यात येत आहे.

काय ट्विट केलं होतं रिहानाने...

या ट्विट नंतर आता सोशल मीडियावर तिचा पाकिस्तानचा झेंडा हातात घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अभिषेक बीजेपी @AbhishekBJPUP या ट्विटर अकाउंट वरून तिचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे. आणि या फोटोला चमचों की नई राजमाता असं कॅप्शन देऊन तिला ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे. https://twitter.com/AbhishekBJPUP/status/1356787154307883009/photo/2

मात्र, खरंच रिहानाने पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन फोटो काढला का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

फक्त अभिषेकच्या अकांउटवरूनच नाही तर अमृता #मोदीजी मेरे भगवान

(@SomvanshiAmrita) या अकांउंटवरून देखील ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये अत्यंत खालच्या स्वरुपाची भाषा तिच्या बाबत वापरण्यात आली आहे.

चमचों की नई #राजमाता अमेरिका की #रिहाना

हाॅलीबुड की ये वामपंथन.... अब भारत को लोकतंत्र सिखाएगी....

असं कॅप्शन या ट्विट ला दिलं आहे.

रिव्हर्स इमेजमधील सिमिलर इमेजच्या टूलमध्ये सर्च केल्यानंतर रिहानाचा हा फोटो 2019 चा असल्याचं आढळून आलं. हा फोटो आयसीसीच्या अधिकृत अकांउंटवरून ट्विट करण्यात आला आहे.

रिहानाने 2019 च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पाठींबा दिला होता. यावेळी तिने झेंडा हातात घेऊन फोटो काढला होता.


एकंदरित रिहानाचा फोटो पाकिस्तानच्या झेंड्यासोबत ट्विट करत तिचं पाकिस्तान कनेक्शन आहे. ती पाकिस्तानवर प्रेम करते. असं सांगण्याचा प्रयत्न ट्रोलर्स ने केल्याचं दिसून येतं. मात्र, तिने कधीही पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन फोटो काढला नसल्याचं Fact Check मध्ये समोर आलं आहे.

Tags:    

Similar News