Fact Check : 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा देणारी मुलगी राहुल गांधी यांच्यासोबत 'भारत जोडो यात्रेत'?

CAA आंदोलनाच्या दरम्यान बंगळूरमध्ये एका मुलीने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या मुलीने राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत गळाभेट घेतल्याचा दावा करत एक फोटो व्हायरल होत आहे. पण हे खरंय का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे फॅक्ट चेक

Update: 2022-09-25 16:59 GMT

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार फोटोत दिसणारी मुलगी ही 2020 मध्ये NRC-CAA विरोधातील आंदोलनादरम्यान बंगळूरमध्ये असदउद्दीन ओवैसी यांच्या सभेत पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणारी अमुल्या नावाची मुलगी आहे. या मुलीला त्यावेळी अटक करण्यात आली होती.

भाजप नेते आणि श्यामा प्रसाद मुखर्ची रिसर्च फौंडेशनचे संचालक डॉ. अनिर्बन गांगुली यांनी ट्वीट एक ट्वीट केले आहे. यात भारत तोडो या हॅशटॅगसह राहुल गांधींसोबत एका मुलीचा फोटो आणि पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या मुलीचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच यात म्हटले आहे की, जीनांच्या संततीला आश्रय देऊन त्यांचे पालनपोषण केल्यामुळे पुर्वीचा किणारा आता मुख्य प्रवाह बनतो आहे. ( Archived)

उत्तर प्रदेश भाजप आयटी सेलचे संयोजक शशी कुमार यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये फोटो आणि अमुल्या लिओनीचा जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये असे लिहीले आहे की, भारत जोडो यात्रा तमाम देशद्रोह्यांचा संघ बनत आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी अमुल्या लिओना राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहे. राहुल गांधी या मुलीची गळाभेट घेत आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर शशी कुमार यांनी हे ट्वीट डिलीट केले. ( Archived )




 

भाजप कार्यकर्ता प्रीती गांधी यांनी ट्वीट केले आहे की, ही भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे. त्यानंतर प्रीती गांधी यांनी हे ट्वीट डिलीट केले. (Link )





भाजप आयटी सेलचे पुनित अग्रवाल यांनी राहुल गांधी यांचा फोटो ट्वीट करून असाच दावा केला आहे. (लिंक)


 



भाजप कार्यकर्ता आशुतोष दुबे यांनीही असाच दावा केला आहे. (लिंक)




राईट विंग वेबसाईट क्रिएटली, भाजप समर्थक कुंवर अजय प्रताप सिंह, राईट विंग ट्रोल अमित, राईट विंग डायलॉगस् यासह काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही हाच दावा केला आहे.


काय आहे सत्य? (Reality Check)

मॅक्स महाराष्ट्रने भारत जोडो यात्र सर्च केली. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यासोबतचा मुलीचा व्हायरल होत असलेला फोटो मिळाला. यामध्ये या मुलीचे नाव मिवा एन्ड्रेलिया असल्याचे म्हटले आहे. या ट्वीटर वापरकर्त्याने मिवा एन्ड्रेलियाचे अभिनंदन केले आहे. ( Archived )


 



यात मिळालेल्या माहितीनुसार आम्ही इन्स्टाग्रामवर सर्च केले. त्यामध्ये Mive_Andreleo या अकाऊंटवरून राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला Happiest Moment in my life असे कॅप्शन दिले आहे.


 



याबरोबरच आणखी एक व्हिडीओ Moidheen.qurayshy या अकाऊंटवरून Miva_Andreleo यांना टॅग केल्याचे दिसत आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यासोबत व्हायरल होत असलेल्या फोटोतील मुलगी दिसत आहे. मिवा एन्ड्रेलिया या अकाऊंटवरील आणखी पोस्ट पाहिल्या. त्यामध्ये काँग्रेसशी संबंधीत पोस्ट आहेत.

Full View

मिवा एन्ड्रेलिया यांच्या अकाऊंटच्या अबाऊटमध्ये त्या काँग्रेसच्या केरळ स्टुडंट युनियनशी जोडल्या असल्याचे दिसत आहे.




 

निष्कर्ष (What is Fact)

वरील सर्व माहितीवरून असे दिसून येत आहे की, राहुल गांधी यांच्यासोबत व्हायरल होत असलेल्या फोटोतील मुलगी ही बंगळूरमध्ये ओवैसी यांच्या सभेत पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणारी अमुल्या लिओनी नाही. अमुल्या लिओनी असल्याचा दावा केलेल्या मुलीचे नाव मिवा एन्ड्रेलिवा असे आहे. ही मुलगी केरळ स्टुडंट युनियनशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

मॅक्स महाराष्ट्रचे आवाहन- कोणताही फॉरवर्ड मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ पुढे पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका, हि विनंती.

Tags:    

Similar News