बन्दूक आणि तलवार हातात घेऊन 'खेला होबे' गाण्यावर नाचणाऱ्या लोकांचा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतरचा आहे का?

Update: 2021-05-05 08:22 GMT

श्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप विरुद्ध तृणमूल कॉंग्रेस असा संघर्ष उभा राहिला आहे. या हिंसाचारात ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत भाजपच्या 6, TMC च्या 4 इंडियन सेक्युलर फ़्रन्ट शी संबंधीत 1 व्यक्तिचा मृत्यू झाला आहे.

याच दरम्यान हातात तलवार आणि बन्दूक घेऊन नाचणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडीओला आवाज 'खेला होबे' गाण्याचा असून लोक यावर डांन्स करत आहेत.

भाजपच्या महिला मोर्चा च्या राष्ट्रीय सोशल मीडियाच्या इंचार्ज प्रीती गांधी ने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रीती यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतरचा आनंदोत्सव अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.


भाजपचे दिल्ली चे जनरल सेक्रेटरी कुलजीत सिंह चहल यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.



शेफाली वैद्य आणि चित्रपट निर्माता अशोक पंडित ने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.


व्हिडीओची सत्यता काय?

व्हिडियो ची फ़्रेम्स रिवर्स इमेजमध्ये यांडेक्स वर सर्च केली असता हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर 26 सप्टेंबर 2020 ला पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत 'खेला होबे' च्या ऐवजी हिन्दी गीत आहे. या गाण्याचे बोल "तेरे लिए कसमें नहीं, कसमें नहीं रस्मे नहीं" असे आहेत.

निष्कर्ष

'खेलो होबे' हे गीत तृणमूल कॉंग्रेसचे युवा नेता देबांग्शु भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. ते 2021 ला रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळं सप्टेंबर 2020 ला अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओच्या दृश्याला फक्त हे गाणं जोडण्यात आलं आहे. त्यामुळं हा व्हिडीओ जुना असून फेक दावा करत व्हायरल करण्यात आला आहे.


 Full View


Tags:    

Similar News