Fact Check: राहुल गांधी भारताला मुस्लिम राष्ट्र करु इच्छितात? काय आहे व्हायरल ट्वीट मागचं सत्य?
एबीपी न्यूजचा एक कथित ग्राफिक्स खासदार राहुल गांधी यांच्या एका ट्वीट सोबक व्हायरल केलं जात आहे. या स्क्रीनशॉट वरती दोन कॅप्शन देण्यात आले आहेत.
काय आहे हे फोटो?
वरचा फोटो तुम्ही पाहिला तर या फोटो मध्ये 'नागरिकता बील पास करुन भाजप हिंदू अजेंड्यावर चालला आहे. आमच्या पुर्वजांचा अजेंडा नेहमीच इस्लामिक कंट्री वर राहिला आहे. त्यामुळं आम्ही दोन मुस्लीम राष्ट्र बनवले, एक पाकिस्तान दुसरा बांग्लादेश आता आम्ही भारताला हिंदू राष्ट्र होताना नाही पाहू शकत.'
हा स्क्रीनशॉट फ़ेसबुक वर व्हायरल आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून हा व्हायरल होत आहे.
हे दोनही फोटो पाहा...
1. दोनही ट्वीटमधील राहुल गांधी यांचे फोटो पाहा.
2. दोनही ग्राफीक्समधील फॉन्ट वेगवेगळे आहेत.
3. व्हायरल फोटोमध्ये एबीपीच्या फोटो सोबत लाल रंगाची बॉर्डर आहे,
यावरुन ग्राफीक्समध्ये कशा प्रकारे बदल केला असल्याचं दिसून येतं.
Alt NEWS ने एबीपी न्यूज नेटवर्कच्या संजय ब्रैगटा यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी ABP न्यूज ने असं कोणतंही ग्राफीक्स चालवलं नसल्याचं म्हटलं आहे.
निष्कर्ष
यावरुन व्हायरल झालेलं ट्वीट खोटं असल्याचं स्पष्ट होतं