Fact Check: 'हा' फोटो नक्की कधीचा आहे?
सध्या भारतीय नागरिकांना अशा प्रकारे आणण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो नक्की कधीचा आणि कुठला आहे? तुम्हाला माहिती आहे का? वाचा
सध्या जगभरात अफगाणिस्तान वर तालिबान ने मिळवलेल्या वर्चस्वाची चर्चा आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेची तेथील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे. या दहशतीमुळे लोक देश सोडून बाहेरच्या देशात जात आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमधील भारतीयांना देखील भारतात आणण्यात आलं आहे.
त्या दरम्यान सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले असून हा फोटोंची सत्यता न पाहताच लोक व्हायरल करत आहे.
अफगाणिस्तान दूतावासाच्या कर्मचाऱ्यांसह तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचं (IAF) विशेष विमानं 16 ऑगस्ट ला काबूलला पाठवण्यात आलं होतं. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, "भारताने या मोहिमेसाठी सी 17 ग्लोबमास्टर विमाने भाड्याने घेतली होती. त्यापैकी एक विमान रविवारी अफगाणिस्तानला पाठवण्यात आले आणि दुसऱ्या विमानाने सोमवारी दिल्लीच्या बाहेरील हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून निघाले."
दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. ज्यामध्ये शेकडो लोक विमानात अडकलेले दिसत आहेत. तसेच हा फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की, "IAF C17 800 लोकांसह परत पाठवण्यात आले... हा फोटो आज सकाळचा काबूल विमानतळावरील आहे."
हा फोटो फेसबुक सोबतच ट्विटरवरही शेअर केला जात आहे.
काय आहे सत्य...?
दरम्यान, गूगलवर रिव्हर्स - इमेज सर्च केले असता af.mil या वेबसाइटवरील २०१३ च्या एका रिपोर्टमध्ये हा फोटो असल्याचं दिसून आलं.
यूएस हवाई दलाच्या वेबसाइटवर माहिती मिळवत असताना माहिती मिळाली नाही. मात्र, 19 डिसेंबर 2013 च्या रिपोर्टचं आर्काइव्ड वर्जन सापडलं.
तसेच फोटोची पडताळणी करत असताना एक आर्काइव्ड लिंक सुद्धा सापडली. ज्यात हा फोटो 17 नोव्हेंबर 2013 रोजी घेण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
या संदर्भात अल्ट न्यूज https://www.altnews.in/hindi/photo-from-2013-viral-as-modi-govt-rescues-800-indians-by-iaf-c-17-aircraft/ ने देखील फॅक्ट चेक केलं आहे.
या फोटोच्या डिस्क्रिप्शननुसार,
"फिलिपिन्सला धडकलेल्या सुपर टायफून हैयाननंतर सी -17 ग्लोबमास्टर मध्ये 670 पेक्षा जास्त टॅक्लोबान रहिवासी मनिलाला रवाना होण्यापूर्वी चा हा फोटो असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या फोटोचं श्रेय यूएस एअर फोर्स फोटो/स्टाफ सार्जंट रॅमन ब्रॉकिंग्टन यांना देण्यात आलं होतं.
मात्र, भारत सरकारने C-17 मधून 800 लोकांना वाचवल्याचा दावा खोटा आहे.
अमेरिकन सरकारने रविवारी 640 लोकांना विमानात बसवले होते. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सी -17, क्रमांक RCH 871, या विमानाने रविवारी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कतारच्या अल उदीद हवाई तळाकडे उड्डाण घेतलं.
एनडीटीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 100 पोलीस कर्मचाऱ्यांसह किमान 200 भारतीय तिथून बाहेर निघण्याची वाट पाहत आहेत. मात्र, सोमवारी साधारण 45 लोकांना तेथून बाहेर काढण्यात आलं आहे. तर मंगळवारी काबूलमधील अधिकारी आणि पत्रकारांची दुसरी तुकडी घेऊन भारतीय हवाई दल सी -17 गुजरातच्या जामनगरला पोहोचले. दरम्यान, 24 तासांच्या चर्चेनंतर एकूण 120 लोकांना भारतात परत आणण्यात आले आहे.
त्यामुळे व्हायरल होणार दावा दोनही बाजूने खोटा आहे. शेअर केला जाणारा फोटो हा अलीकडचा नसून २०१३ चा आहे तसेच भारत सरकारने 800 लोकांना काबूलमधून बाहेर काढल्याचा दावा सुद्धा खोटा आहे.