Fact Check: पश्चिम बंगालच्या निवडणूकीनंतर व्हायरल झालेला हिंसाचाराच व्हिडीओ नक्की कुठला आहे?
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 290 जागांपैकी 200 पेक्षा जास्त जागा मिळवून राज्यात पुन्हा आपले सरकार स्थापन केले. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याचं सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसंच एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार या हिंसाचारात आत्तापर्यंत 11 जणांनी आपला जीव गमावला आहे.
त्यांपैकी ६ भाजप कार्यकर्ते, तृणमूल काँग्रेसचे ४ कार्यकर्ते आणि इंडियन सेक्युलर फ्रंटशी संबंधित 1 व्यक्तीचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. या हिंसाचारा दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ नक्की पश्चिम बंगालचेच आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. त्या पैकीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये जमाव पोलीसांवर हल्ला करत आहेत. या व्हीडिओचे कॅप्शनमध्ये सदर व्हिडीओ पश्चिम बंगालचा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
काय आहे व्हिडीओ?
व्हिडिओमध्ये काही लोक पोलिसांच्या गाडीवर आणि पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विट करत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे. ट्विटर हँडल @AdityaT009 यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणतात पोलिस या इस्लामिक तृणमूल काँग्रेसपासून स्वत:चं रक्षण करू शकत नाहीत, या यांच्या विरोधात सैन्य तैनात केले पाहिजे.
Police is not able to save themself from this Isl@maic TMC goons, army should be deployed against this terrorists#नींद_से_जागो_अमित_शाह_जी#PresidentRuleInBengal#BengalViolence pic.twitter.com/9xOrTIyvE6
काय आहे सत्य?
यूट्यूबवर की-वर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ 13 जानेवारी 2021 रोजी कनक न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड झाल्याचं पाहायला मिळालं. कॅप्शन मध्ये भद्रक शहरातील एका कैद्याच्या मृत्यूमुळे स्थानिक लोक नाराज झाले होते. आणि या नाराज झाल्याने लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. ही घटना ओडिसामधील भ्रमक जिल्ह्यामधील आहे.
14 जानेवारी 2021 च्या द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार - भद्रक जिल्ह्यातील एका गावात 22 वर्षीय तरुणाची पोलिसांच्या भीतीने मृत्यू झाला होता. नक्की काय प्रकरण आहे? एका जुन्या केस संदर्भात पोलीस बापी महालिक नावाच्या व्यक्तीच्या मेव्हण्याला चौकशीसाठी शोधत होते. बापी हा व्यक्ती पोलिसांना पाहून घाबरून पळून गेला आणि पोलिस अशोक समझत त्याच्या मागे धावली. पोलिसांच्या भीतीने बापी यांनी कचरा असलेल्या विहिरीत उडी मारली, या घटनेनंतर ग्रामस्थांनी बापीच्या पार्थिव रस्त्यावर ठेवलं. हे संपूर्ण प्रकरण घडत असताना पिराहाट पोलीस दुसऱ्या एका आरोपीला त्या ठिकाणाहून घेऊन जात होते.
१३ जानेवारीच्या ओडिशा टीव्हीच्या रिपोर्टनुसार - पोलिस एका प्रकरणाबाबत बापी महालिक यांची चौकशी करत होते. चौकशीदरम्यान पोलीस बापीला त्रास देत असल्याचा आरोप बापीच्या कुटुंबीयांनी केला होता. पोलीस घरी येताच ते बापीला मारू लागले. असं बापीच्या वडिलांनी ओडिशा टीव्हीशी बोलतांना सांगितलं. काय आहे सत्य? ओडिशामधील या घटनेचे अनेक अँगल समोर येत आहेत, मात्र, व्हायरल व्हिडिओ हा पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराचा नाही हे निश्चित आहे. इंडिया टुडे डिजिटलचे व्यवस्थापकीय संपादक कमलेश सिंग यांनीही हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा सांगत ट्विट केला होता. मात्र, नंतर हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा नसून जुना असल्याचे सांगत त्यांनी ट्विट डीलीट केलं.