Fact Check : रेस्क्यू ऑपरेशनचा व्हायरल व्हिडीओ तेलंगणातील आहे का?
सध्या पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर रेस्क्यू ऑपरेशनचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तर हा व्हिडीओ तेलंगणातील असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. मात्र हा दावा खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा...
देशात अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तेलंगणामध्ये महापूर निर्माण झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. तसेच नदीकिणारील भाग पूरामुळे प्रभावित झाला. तर तेलंगणामध्ये दोन शेतकरी पाण्याच्या टाकीवर अडकले होते. ज्यांना भारतीय हवाई दलाने सुरक्षित बाहेर काढले असा दावा करत काही माध्यमांनी वृत्त दिले.
तेलंगणातील गोदावरी नदीला भीषण पूरादरम्यान भारतीय हवाई दलाने रेस्क्यू ऑपरेशन करत नदीतील वेगाने वाहणाऱ्या पाण्यात जेसीबीवर अडकलेल्या लोकांना रेस्क्यू केल्याचा कथीत व्हिडीओ दाखवत तो तेलंगणातील असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
इंडिया टुडेने हा व्हिडीओ तेलंगणात आलेल्या पूराचा असल्याचा दावा केला आहे.
टाईम्स नाऊ नवभारत आणि टाईम्स नाऊने व्हिडीओ ब्रॉडकास्ट करत हाच दावा केला आहे.
झी बिहार झारखंडने हा व्हिडीओ तेलंगणातील असल्याचा दावा केला आहे.
मिरर नाऊ ने या व्हिडीओबाबत हाच दावा केला आहे.
टीव्ही 9 कन्नड ने व्हिडीओ शेअर करताना हाच दावा केला आहे.
न्यूज १८, न्यूज एजंन्सी IANS, तेलंगना टुडे, तेलगू स्टॉप, मिरर नाऊ, टाइम्स नाऊ, न्यू इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार व्ही व्ही बालकृष्ण यांनी याच दाव्यासह हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. अशाच प्रकारे पब्लिक टीव्ही, ईटीव्ही तेलंगना, सियासत, इंडिया डॉट कॉम यासारख्या माध्यमांनीही हा व्हिडीओ तेलंगणातील गोदावरी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या लोकांचा असल्याच्या दाव्यासह ट्वीट केला आहे.
पडताळणी
अल्ट न्यूजने पडताळणी करत असताना न्यू इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार व्ही व्ही बालकृष्ण यांच्या ट्वीटवर प्रतिक्रीया देतांना हा व्हिडीओ जुना असून आंध्र प्रदेशमधील असल्याचे म्हटले आहे. याआधारे अल्ट न्यूजने काही कीवर्ड शोधल्यानंतर एनडीटीव्ही आणि हिंदूस्थान टाइम्सचा 20 नोव्हेंबर 2021 चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातील चित्रवती नदीला आलेल्या पुरात 10 लोक अडकले होते. त्यांना भारतीय हवाई दलाने रेस्क्यू केले होते.
एनडीटीव्हीच्या 21 नोव्हेंबर 2021 च्या रिपोर्टमध्ये अशाच प्रकारचे दृष्य़ दिसत आहेत.
सोबतच युट्यूबवर एक्सट्रीम व्हिडीओज नावाच्या एका चॅनलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये काही माध्यमांनी हा व्हिडीओ आत्ताचा तेलंगणातील असल्याचे म्हटले आहे.
इंडियन एअर फोर्सने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, 'आज इंडियन एअर फोर्सच्या MI-17 या हेलिकॉप्टरने आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीच्या पूरात फसलेल्या 10 लोकांना खराब वातावरण असतानाही सुरक्षित बाहेर काढले.
निष्कर्ष
वरील मुद्द्यांचा विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाकडून 2021 मध्ये केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला काही माध्यमांनी तेलंगणातील पूराशी जोडून शेअर केले होते. मात्र माध्यमांनी खोटी माहिती पसरवल्याचे दिसून येत आहे. तर आंध्र प्रदेशातील पूराचा व्हिडीओ शेअर करून तो तेलंगणातील असल्याचा फेक दावा करण्यात आला होता.