लालू प्रसाद यादव यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल

Update: 2021-02-08 12:52 GMT

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या निधनाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. संजय मीना नावाच्या व्यक्ती ने फेसबूक वर

मूळ पोस्ट 

'बेहद दुःखद खबर, पूर्व रेल मंत्री एवं बिहार के पूर्व मुख्यमंत्री , दबंग छवि के नेता श्री लालू प्रसाद यादव का निधन….ईश्वर उनकी आत्मा को शान्ति प्रदान करें एवं परिवार जन को सब्रे जमील अता फरमायें."


 ट्विटर युजर्स शिवप्रताप हर्सना यांनी देखील (Shiv Pratap Harsana) लालू प्रसाद यादव यांच्या निधनाची फोस्ट ट्विटर ट्विट केली आहे. यामध्ये ते म्हणतात...

बेहद दुःखद खबर

पूर्व रेल मंत्री एवं बिहार के पूर्व मुख्यमंत्री , दबंग छवि के नेता श्री लालू प्रसाद यादव का निधन....।

ईश्वर उनकी आत्मा को शान्ति प्रदान करें एवं परिवार जन को सब्रे जमील अता फरमायें।


काय आहे सत्यता?

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना 23 जानेवारी 2021 ला दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव सध्या शिक्षा भोगत आहेत. लालू यांना निमोनिया झाला असून कारागृह प्रशासनाने त्यांना 23 जानेवारीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे. मॅक्समहाराष्ट्रने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, तातडीनं दिल्लीला हलवलं…

या संदर्भात एनडीव्ही हिंदी या वृत्तवाहिनीने देखील उत्तर दिलं आहे.

लालू यादव की हालत गंभीर, शाम को चार्टर्ड प्लेन से दिल्ली के AIIMS लाया जाएगा

लालू प्रसाद यादव यांच्या मृत्यूचं कोणतंही वृत्त नाही. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचं वृत्त आहे. अलिकडे सोशल मीडियावर मोठ्या नेत्यांच्या मृत्यूच्या पोस्ट अशा पद्धतीने व्हायरल होत असतात. त्यावर विश्वास ठेवू नये. लालू प्रसाद यादव यांच्या मृत्यूच्या बातमीत कुठलंही तथ्य नाही.

Tags:    

Similar News