UPSC परीक्षेत 'इस्लामिक स्टडीज' विषय घेऊन मुलं IAS होत आहेत का?

Update: 2021-08-08 11:05 GMT

काजल सिंघी नावाच्या एका फेसबूक युजरने 'देश का DNA' या फेसबूक पेजवर पोस्ट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. 'जर इस्लामिक अभ्यास IAS बनवू शकतो' तर वेद, रामायण, गीता, उपनिषदाचा अभ्यास देखील यूपीएससी परीक्षेत समाविष्ट केला पाहिजे. फक्त सनातन धर्माबद्दल एवढा तिरस्कार का...??

या पोस्टला 16 हजार लाइक्स मिळाल्या आहेत. तर या पोस्टद्वारे लोक इस्लामिक अभ्यासाचा अभ्यास करून IAS होत आहेत. असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

फेसबूक वर अनेकांनी ही पोस्ट केली आहे आणि सोबत कोणीही सनातन धर्माला गांभीर्याने घेत नसल्याचा दावा केला आहे. 'सनातन परिवार' नावाच्या फेसबूक पेजनेही ही पोस्ट शेअर केली आहे.

Full View

या अगोदर 2019 ला सुद्धा हा दावा शेअर केला जात होता. आलोक भट्ट यांनी 2019 मध्ये दावा केला होता की, अरब संस्कृती आणि इस्लामिक अभ्यास हा IAS प्रवेश परीक्षेचा विषय आहे.

आलोक भट्ट यांना पंतप्रधान मोदींसोबतच भाजपचे अनेक मोठे नेते ट्विटरवर फॉलो करतात. त्यांनी या संदर्भात ट्वीट केलं होतं. त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं...ज्ञान असल्यामुळे एखाद्याला भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी मिळते.

काय आहे सत्य...

आलोक भट्ट यांनी शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या वेबसाइट्सच्या लिंक पाहायला मिळाल्या. मात्र कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नाही.

यानंतर यूपीएससीची अधिकृत वेबसाइट तपासली असता असं दिसून आलं की सोशल मीडियावर केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे.

दरम्यान मार्च 2021 मध्ये जारी झालेल्या यूपीएससी परीक्षेची अधिसूचना तपासली असता इस्लामिक स्टडीजचे नाव कुठेही दिसून आले नाही.

UPSC च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतल्या जातात. प्रीलियम्स, मेन्स आणि मुलाखत प्रीलियम्स, मेन्स मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच मुलाखत होते

तर प्रीलियम्सच्या अभ्यासक्रमात सामान्य ज्ञान, इतिहास, आर्थिक आणि सामाजिक विकास, हवामान बदल, तार्किक तर्क, भारतीय राजकारण आणि शासन संविधान, सामान्य विज्ञान, वाचन आकलन, भूगोल यांचा समावेश आहे. 2 तासांच्या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. हे दोनही पेपर 200-200 गुणांचे असतात.

मेन्सच्या अभ्यासक्रमात 7 विषय असतात. सर्व उमेदवारांसाठी 5 विषय अनिवार्य असतात. मात्र, सहाव्या आणि सातव्या विषयाची निवड ही उमेदवाराच्या इच्छेनुसार ते निवडू शकतात. पण या पर्यायी विषयांमध्ये कुठेही इस्लामिक अभ्यासाचा उल्लेख दिसून आला नाही.

परिक्षेचा शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. या मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. यामध्ये कोणत्याही विषयाची निवड करण्याची गरज नसते. त्यामुळे इस्लामिक अभ्यासाचा अभ्यास करून लोक IAS होत असल्याचा सोशल मीडियावर केला जाणारा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

दरम्यान आयएएस (IAS) सोमेश उपाध्याय यांनी २०२० मध्ये एक ट्विट करत अशा दाव्यांची खिल्ली उडवली होती. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं.

व्हॉट्सअॅपच्या जगातच असे दावे केले जातात की, UPSC च्या परीक्षेत इस्लामिक अभ्यासासारखा विषय आहे.

निष्कर्श:

एकंदरितच सोशल मीडियावर UPSC परीक्षेत 'इस्लामिक स्टडीज' हा विषय निवडून मुल IAS होत असल्याचा दावा खोटा आहे.

Tags:    

Similar News