Fact Check : जय श्रीराम घोषणा देणाऱ्या जमावाला निडरपणे सामोरी जाणाऱ्या मुस्कानचे राहुल गांधी कनेक्शन आहे का?

कर्नाटकात हिजाब परिधान केलेल्या मुलीला भगवा पंचा घातलेल्या जमावाने जय श्रीराम घोषणा देत त्रास दिला. यावेळी मुलगी निडरपणे जमावाला सामोरी गेली.

Update: 2022-02-12 15:31 GMT

 कर्नाटक राज्यातील एका महाविद्यालयातून सुरू झालेल्या हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटत आहेत. तर महाविद्यालयाच्या परिसरात भगवा पंचा घालून जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या जमावाला निडरपणे सामोरे जात अल्लाहू अकबर घोषणा देणाऱ्या मुस्कानचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. देशभरातून त्या मुलीच्या निडरपणाचे कौतूक केले जात आहे. पण आता मुस्कानबाबत अनेक भ्रामक दावे शेअर केले जात आहेत. राहुल गांधी यांच्यासोबतचा एका मुलीचा फोटो व्हायरल होत असून ती मुस्कान असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यातील सत्यता काय हे जाणून घेऊयात...




 

ट्वीटर हँडल @Vankadoth_Kumar याने राहुल गांधी यांच्यासोबत फोटो शेअर करत ही मुलगी कोण आहे? हा प्रश्न विचारला आहे. ( अर्काईव्ह लिंक)



ट्विटर आणि फेसबुकवर खालील फोटो व्हायरल होत आहेत.




 

पडताळणी :

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसणारी मुलगी कर्नाटकातील हिजाब वादात जय श्रीराम घोषणा देणाऱ्या जमावासमोर निडरपणे अल्लाहू अकबर घोषणा देणारी मुलगी नाही, अशी माहिती व्हायरल होत असलेल्या फोटोतील मुलीने ट्विटरवर दिली आहे.

राहुल गांधी यांच्यासोबत दिसत असलेली महिला अंबा प्रसाद असून त्या काँग्रेस पक्षातर्फे झारखंड राज्यातील बडकागाव विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत.



८ फेब्रुवारी रोजी अंबा प्रसाद यांनी फेसबुकवर पोस्ट करून काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली होती.

Full View

निष्कर्ष : सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेला अंबा प्रसाद यांचा राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो कर्नाटकात जय श्रीराम घोषणा देणाऱ्या जमावाला सामोरे जाणाऱ्या मुस्कानचा असल्याचा दावा खोटा आहे. तर या प्रकरणात राहुल गांधी यांच्याशी कनेक्शन असल्याचा दावाही साफ खोटा आहे.

या संदर्भात Alt news ने Fact check केलं आहे. हिजाब विवाद: वायरल तस्वीर में राहुल गांधी के साथ भगवा भीड़ का विरोध करने वाली मुस्कान नहीं

Tags:    

Similar News