Fact Check : प्रयागराजच्या हनुमान मंदिरात युवकाने खरंच नमाज पठन केले का?

प्रयागराजच्या हनुमान मंदिरात एक युवक नमाज पढत असल्याचा दावा करत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र प्रयागराज येथील हनुमान मंदिरात युवकाने नमाज पठन केल्याचा दावा खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक...;

Update: 2022-09-21 07:21 GMT

उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये एका हनुमान मंदिरात एक युवक नमाज पठन करत असल्याचा दावा करणारा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. तर यासंदर्भात उत्तरप्रदेशातील स्थानिक न्यूज पोर्टल असलेल्या Uttarpradesh.org ने दावा केला आहे की, प्रयागराजमधील हनुमत निकेतन हनुमान मंदिर येथे एक युवक नमाज पठन करत असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक गमजा घेतलेला युवक हातांना कानाजवळ नेत सजदा करताना दिसत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रकाशित करत असलेले राष्ट्रीय पत्रिका पांचजन्य ने व्हिडीओ ट्वीट करताना एक व्यक्ती सिव्हील लाईन हनुमान मंदिरात नमाज पठन करताना आढळल्याचा दावा केला आहे.




पांचजन्यचे स्पेशल करस्पाँडंट अश्विनी मिश्रा यांनीही असाच दावा केला आहे.




 

ट्वीटर वापरकर्ते असलेल्या दीपक शर्मा यांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटले आहे की, कधीपर्यंत हिंदूंच्या भावनांशी अशाच प्रकारे खेळ केला जाणार आहे.


 



पडताळणी ( What is Reality?)

प्रयागराज पोलिसांनी व्हिडीओ ट्वीट करत युवकाची ओळख सांगितली आहे. ज्यामध्ये युवकाचा जबाब आहे. पोलिसांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमधील युवक सांगत आहे की, मी वज्रासनामध्ये बसून प्रार्थना करत होतो. जी योगासनामधील एक मुद्रा आहे. या व्हिडीओमध्ये युवकाने सांगितले आहे की, काही लोकांनी त्याचा व्हिडीओ काढून त्याला सांप्रदायिक वळण दिले आहे. तर पोलिसांनी या युवकाचे नाव वैभव त्रिपाठी असल्याचे म्हटले आहे. तर या युवकावर हनुमान मंदिरात नमाज पठन करत असल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, समाजातील शांतता भंग होईल अशा प्रकारच्या अफवा पसरवणारांपासून सावध रहा.

प्रयागराजचे वरिष्ठ पोलिस अधिकारी शैलेश पांडे यांनी सांगितले आहे की, हनुमान मंदिरात युवक नमाज पठन करत असल्याचा दावा खोटा आहे. त्यामुळे अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले.

निष्कर्ष : पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार आणि युवकाने मांडलेल्या भुमिकेवरून हनुमान मंदिरात युवक नमाज पठन करत असल्याचा दावा खोटा ठरतो. त्यामुळे Uttarpradesh.org , RSS चे साप्ताहिक पांचजन्य आणि पांचजन्यचे पत्रकार अश्विनी मिश्रा यांनी व्हिडीओची सत्यता न तपासता त्यातून भ्रामक दावा केला. त्यामुळे असा प्रकारे कोणत्याही घटनेची सत्यता तपासल्याशिवाय व्हिडीओ फॉरवर्ड करण्यात येऊ नयेत.

हे फॅक्ट चेक अल्ट न्यूजने केले आहे.

Tags:    

Similar News