Fact Check : Bandra-Worli Sea Link: कोणाच्या काळात झालं काम? मोदी की मनमोहन सिंह?

Bandra-Worli Sea Link लोक नरेंद्र मोदी यांचे आभार का मानत आहेत?

Update: 2021-07-24 05:44 GMT

एका पुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा पुल मुंबईतील वांद्रे येथील असल्याचं म्हटलं जात आहे. या पुलाच्या फोटो सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले जात आहेत. @REAL_HINDUVT या ट्विटर हँडलने सुद्धा हा फोटो ट्विट करत मोदींचं कौतुक केलं आहे. या ट्विटला 9 हजार लाईक्स मिळाल्या आहेत. या फोटोला जवळपास 1 हजार 600 रिट्विट्स आहेत. @REAL_HINDUVT या ट्विटर हँडलचे यूजर हे उत्तर प्रदेशमधील राजकारणी असल्याचं त्यांच्या बायो मधून दिसून येतं.




फेसबुकवरही या पुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा पुल अमेरिका किंवा लंडनचा नाही तर मुंबईतील वांद्रे येथील आहे.




 





 


 



काय आहे सत्य?

रिव्हर्स इमेज सर्च मध्ये हा फोटो सर्च केला फोटो "काँग्रेसचा विकास" असं म्हणत शेअर केल्याचं दिसून आलं. काँग्रेसचे सदस्य रोशनलाल बिट्टू यांनी हा फोटो ६ जुलै ला पोस्ट केला होता. मुंबईतील वांद्रे - वरळी सी लिंकचा हा फोटो असल्याचं कॅप्शन त्यांनी दिलं होतं. रिवर्स इमेज सर्चमध्ये आणखी काही पोस्टच्या लिंक्स देखील दिसून आल्या. 'मुंबई मेरी जान' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने हा फोटो २८ मार्च २०२० ला तपन दवे यांना क्रेडिट देत पोस्ट केला होता.




 



त्यानंतर आम्ही तपन दवे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं असता, ७ जून २०२० ला त्यांनी हा फोटो अपलोड केल्याचं दिसून आलं. तपन यांनी हा फोटो पोस्ट करताना #bandraworalisealink या हॅशटॅगचा वापर सुद्धा केला होता. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुंबईतील अनेक ठिकाणचे सुंदर फोटोज पाहायला मिळतात.


 



पूल कोणी बांधला?

दरम्यान की वर्ड सर्चद्वारे वांद्रे - वरळी हा पुल UPA च्या काळात बांधल्याचं समजलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ३० जून २००९ रोजी या पुलाचं उदघाटन केलं होतं. या उदघाटनाविषयी काही माध्यमांनी वृत्त ही दिलं होतं. न्यूज एक्स ने या उदघाटनादरम्यानचा एक व्हिडिओ ३० जून २००९ रोजी अपलोड केला होता.


  Full View

 इंडिया टुडेने सुद्धा उदघाटनाचे काही फोटो पोस्ट केले होते.


निष्कर्श

म्हणजेच, मुंबई-वांद्रे सी लिंक पुलाचा भाजप किंवा नरेंद्र मोदींशी काहीही संबंध नाही. या पुलाचं उदघाटन २००९ साली झालं होतं. आणि २००९ साली नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हते. २००९ ला मनमोहन सिंह पंतप्रधान होते. नरेंद्र मोदी २०१४ ला पंतप्रधान झाले. याशिवाय या सी लिंकचा पाया बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ मध्येच घातला होता. आणि त्यानंतर १० वर्षांनी म्हणजेच २००९ साली सोनिया गांधी यांनी या पुलाचं उदघाटन केलं.

Tags:    

Similar News