FactCheck :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरचं शरद पवारांना भेटले का?

सोशल मिडीयातील व्हायरल बातम्या आणि फोटोंमुळे भल्याभल्यांचे गैरसमज होतात. डिजीटल माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री भेटीचा जुना फोटो बातम्या प्रसिध्द केल्यानं सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ट्विट करुन स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.;

Update: 2022-07-06 07:06 GMT

सोशल मिडीयातील व्हायरल बातम्या आणि फोटोंमुळे भल्याभल्यांचे गैरसमज होतात. डिजीटल माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री भेटीचा जुना फोटो बातम्या प्रसिध्द केल्यानं सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ट्विट करुन स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानं नव्या राजकीय समीकरणानुसार नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार घेतला. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचे दौरे सुरु झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी काल आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला.

काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट झाल्याचे फोटो प्रसिध्द झाले होते. काही वृत्तवाहिन्यांनी आणि शिंदे आणि पवार यांच्या जुन्या फोट्याच्या आधारावर रात्री उशीरा हा दोन्ही नेत्यांची सिव्हर ओकवर भेट झाल्याच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र अशाप्रकारची कुठलीही भेट झालेली नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.



अधिक माहीती घेतली असता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर उपचार सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी ११ नोव्हेंबर २०२१ ला शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भेटीची माहिती देण्यात आली होती. या भेटीचा फोटो आता व्हायरल केला जात असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक प्रमुख माध्यमांनी आणि वृत्तवाहीन्यांनी असे खोडसाळ वृत्त प्रसारीत केल्यानं सोशल मिडीयावर आता संताप देखील व्यक्त केला जात आहे.

Tags:    

Similar News