Fact Check: रामनाथ कोविंद यांचा पाऊणे तीन लाख रुपये टॅक्स खरंच कापला जातो का?

Update: 2021-06-28 12:35 GMT

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या मासिक वेतनाविषयी तसेच त्यांच्या वेतनातून पाऊणे तीन लाख रुपये टॅक्स जात असल्याचं विधान केलं. या विधानानंतर सोशल मीडियावर उधाण आलं आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्ते राष्ट्रपतींच्या या विधानावर टीका करत आहेत. कानपुर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सगळ्यांना माहितच आहे, राष्ट्रपती देशातला सर्वात जास्त वेतन धारक व्यक्ती आहे. पण राष्ट्रपती टॅक्स सुद्धा देतातच ना! मी पाऊणे तीन लाख रुपये महिन्याला टॅक्स देतो. मात्र, सगळ्यांना ५ लाख रुपयेच दिसतात.

पण पाऊणे तीन लाख रुपये टॅक्स जाऊन हातात किती राहतात? जेवढे राहतात त्यांच्यापेक्षा जास्त तर अधिकाऱ्यांचे पगार असतात. शिक्षकांना तर सगळ्यात जास्त वेतन मिळतं. दरम्यान ट्विटरवर अनेकांनी राष्ट्रपतींच्या या विधानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. @puneetsinghlive या ट्विटर हँडलने लिहिलं आहे की, राष्ट्रपती सुद्धा टॅक्स देतात का? यावर एका ट्विटर हँडलने कंमेंट करत लिहिलं की, मी जेवढी शिकली आहे, तेवढ्यात मला हे माहिती आहे की, राष्ट्रपतींचे वेतन तसेच भत्ते हे टॅक्स फ्री असतात.


तर काही ट्विटर हँडलने या विषयावर चौकशी करायला हवी असं म्हणत लिहिलं आहे की, भारतीय संविधानाने राष्ट्रपतींना टॅक्स पासून सवलत दिलेली आहे. मग राष्ट्रपती पाऊणे तीन लाख रुपये टॅक्स कोणाला देत आहेत, हे देशाला कळायला हवं. राष्ट्रपतींच्या या विधानावर पत्रकार रणविजय सिंह यांनी ट्विट केलंय - तुम्ही सगळे थट्टा करत आहात, परंतू ही एक गंभीर बाब आहे. कर कमी केल्याने लोक त्रस्त आहेत. राष्ट्रपतीसुद्धा हे जाणतात. मात्र, त्यांची जास्त कपात होत आहे ५०% + टॅक्स कापला जात आहे. सरकारने काळजी घ्यायला हवी. अन्यथा पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवावेत, पण आमच्या राष्ट्रपतींना दिलासा द्यावा.



काय आहे सत्य?


भारताचे राष्ट्रपती हे तिनही दलाचे प्रमुख असतात. राष्ट्रपतींचा पगार आहे. देशातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा अधिक आहे. २०१७ पर्यंत राष्ट्रपतींना दरमहा १.५० लाख रुपये वेतन मिळत होते. जे देशातील सर्वोच्च अधिकारी, उच्चप्रमुख आणि कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा कमी होते. त्यांनतर २०१७ पासून राष्ट्रपतींना दरमहा ५ लाख रुपये वेतन दिले जाऊ लागले. हा पगार विना टॅक्स असतो. पगाराव्यतिरिक्त राष्ट्रपतींना इतर सुविधा तसेच भत्ते सुद्धा दिले जातात. वैद्यकीय सुविधा, निवास या सोबतच कर्मचारी, भोजन आणि पाहुण्यांचे होस्टिंग यासारख्या इतर खर्चावर भारत सरकार दरवर्षी २२.५ दशलक्ष रुपये खर्च करतं. तसेच राष्ट्रपतींच्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. सोबत एक सुसज्ज बंगला, दोन विनामूल्य लँडलाईन आणि एक मोबाइल फोन, वर्षाकाठी ६०,००० कर्मचारी खर्च, ट्रेन किंवा विमानाने मोफत प्रवास, यांसारख्या असंख्य सुविधा मिळतात. जगातील सर्वात जास्त पगाराच्या नेत्यांमध्ये भारतीय नेते कुठेही दिसत नाहीत. मात्र, यूकेची क्वीन एलिझाबेथ सर्वात जास्त वेतन घेणारी राजकीय व्यक्ती आहे.


निष्कर्ष


देशाच्या राष्ट्रपतीला 5 लाख रुपये वेतन मिळतं. ज्याला टॅक्स आकारला जात नाही.

Tags:    

Similar News