RahulGandhi राहुल गांधी आणि हिंडेनबर्गचे नॅथन अँडरसन (Nathan Anderson) कनेक्शन काय?

Update: 2023-02-21 14:41 GMT

 “हिंडेनबर्ग रिसर्च” न्यूयॉर्क स्थित नॅथन अँडरसन यांनी स्थापन केलेली गुंतवणूकदार संशोधन संस्था आहे. या संस्थेने 24 जानेवारी 2023 रोजी, हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालाचे शीर्षक होते, 'Adani Group: How the world's third richest man is running the largest scam in corporate history'. या अहवालात गौतम अदानी यांच्या कंपनीवर अनेक दशकांपासून 'स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड' असे अनेक आरोप करण्यात आले होते.

या वादामुळे संसदेत प्रचंड गदारोळ झाला आणि काँग्रेसने व्यापक निषेध सुरू केला. या स्थितीत अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी दावा केला आहे. की हिंडेनबर्गचे शोधक नॅथन अँडरसन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट झाली.

तथ्य तपासणी

Yandex वर रिव्हर्स इमेज सर्च करताना, Alt News ला 2018 मधील अनेक मीडिया रिपोर्ट सापडले. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी जर्मनीला गेले होते.

टाइम्स ऑफ इंडियाने हॅम्बर्गमध्ये राहुल गांधींच्या जर्मन मंत्र्यांसोबत झालेल्या भेटीचे फोटो प्रसिद्ध केले होते. द इंडियन एक्स्प्रेस आणि द ट्रिब्यून इंडियानेही असाच अहवाल प्रसिद्ध केला होता. हा फोटो 22 ऑगस्ट 2018 चा आहे आणि या सर्व रिपोर्ट्समध्ये राहुलच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीची ओळख जर्मनीतले राज्यमंत्री आणि खासदार नील्स अॅनेन अशी करण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या PTI कथेचा स्क्रीनशॉट खाली दिला आहे.




 


काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे छायाचित्र शेअर करताना सांगण्यात आले होते की, राहुल गांधी यांच्यासोबत उभी असलेली व्यक्ती जर्मनीच्या नेत्यांपैकी निल्स एनेन आहे. आणि त्यांना भेटण्याचा उद्देश हा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे इतकाच होता.

म्हणजेच व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राहुल गांधी सोबत नॅथन अँडरसन नसून राहुल गांधी यांच्यासोबत उभी असलेली व्यक्ती जर्मनीचे राज्यमंत्री आणि खासदार नील्स अॅनेन आहे. हा फोटो ऑगस्ट 2018 चा आहे जेव्हा राहुल गांधी जर्मन धोरणकर्त्यांना भेटण्यासाठी हॅम्बर्गला गेले होते. 

Tags:    

Similar News