Fact Check : कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्याने राम मधील 'म' चा अर्थ मोहम्मद सांगितला का?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुस्लिम मतांसाठी राम शब्दातील 'म' चा अर्थ 'मोहम्मद' सांगितला असल्याचा दावा केला जात आहे.पण काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य? जाणून घेण्यासाठी वाचा...;
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा 11 सेकंदांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राम शब्दातील 'र' चा अर्थ 'राम' असा आहे तर 'म' चा अर्थ मोहम्मद असल्याचं वक्तव्य मुस्लिम मतांसाठी केल्याचा दावा करण्यात येत आहे.
अखंड भारत संकल्प या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ काँग्रेस मुक्त भारत या या हॅशटॅगसह शेअर केला आहे. (अर्काइव्ह लिंक )
राजस्थान भाजपचे सोशल मीडिया हेड अभिषेक आचार्य कुलश्रेष्ठा यांनीही याच दाव्याने व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये अशोक गेहलोत यांना 'घटिया' मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. (अर्काइव्ह लिंक)
अशाच प्रकारे दावा करत हा व्हिडीओ अनेक ट्वीटर वापरकर्त्यांनी ट्वीट केला आहे.
याच प्रकारचा दावा करत फेसबुकवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात येत आहे.
पडताळणी :
अल्ट न्यूजने या व्हिडीओसंबंधी काही की-वर्डस सर्च केले. त्यामध्ये अशोक गेहलोत यांच्या युट्यूब चॅनलवर या संपुर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ 28 मे रोजी अपलोड करण्यात आला आहे. तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नागौर जिल्ह्यातील रेण गावात ब्रम्हलिन आचार्य श्री हरिनारायण जी महाराज यांच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सुध्दा सहभागी झाले होते.
खाली दिलेल्या व्हिडीओत या व्हिडीओचा व्हायरल होत असलेला भाग 41 मिनिट 24 सेकंदाला सुरू होतो. यामध्ये अशोक गेहलोत म्हणतात की, "दरियाव महाराज ने कहा था कि राम में जो है 'र' वो तो मतलब है 'राम' का और 'म' है 'राम' का 'म' उसका मतलब है 'मोहम्मद' है. ऐसी हिन्दू-मुस्लिम एकता के प्रतीक दरियाव जी महाराज थे."
त्यामुळे अशोक गेहलोत यांनी राम शब्दातील 'म' चा अर्थ 'मोहम्मद' असल्याचे वक्तव्य दरियाव महाराज यांना कोट करून या कार्यक्रमात वापरले आहे.
या व्हिडीओनंतर काही की-वर्ड सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजला 2017 साली प्रसिध्द झालेला एक ब्लॉग मिळाला. त्यामध्ये दरियाव महाराज यांच्या हवाल्याने लिहीले आहे की, 'र' रा तो रब्ब आप है, 'म' मा मोहम्मद जाण। दोय हरफ के मायनें, सब ही वेद पुराण."
यानंतर अल्ट न्यूजने दिव्य देवल पीठाशी संपर्क साधला. त्यावेळी तेथील पीठाघ्यक्ष आचार्य सज्जनराम यांनी सांगितले की, 28 मे रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राम शब्दातील म चा अर्थ मोहम्मद असल्याचे वक्तव्य दरियाव महाराज यांना कोट केले आहे. त्यामध्ये दरियाव महाराज यांनी म्हटले होते की, र' रा तो रब्ब आप है, 'म' मा मोहम्मद जाण. यासोबत आचार्य सज्जनराम यांनी दरियाजी महाराज यांच्या 'श्री दरियाव दिव्य वाणी' या पुस्तकाचे काही पानांचे फोटो अल्ट न्यूजला पाठवले. या पुस्तकात हिंदू मुस्लिम एकतेला चालना देणारे अनेक दोहे आहेत. त्यापैकी अशोक गेहलोत यांनी आपल्या भाषणात वापरलेला दोह्याचाही समावेश आहे.
निष्कर्ष : वरील व्हिडीओत अशोक गेहलोत यांनी केलेला दावा दरियाव महाराज यांना कोट करून 'म' चा अर्थ 'मोहम्मद' आहे असा आहे. त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओची क्लिप भ्रामक दाव्यासह शेअर केली जात आहे. हा दरियाव जी महाराज यांच्या दोह्याचा एक भाग आहे. ज्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा विचार आहे. मात्र अशोक गेहलोत यांनी दरियाजी महाराज यांचे विधान पुर्ण कोट केले नाही. त्यामध्ये त्यांनी र चा रब्ब म्हटले आहे. राम नाही.
Alt News : https://www.altnews.in/hindi/clipped-video-of-ashok-gehlot-shared-as-he-said-m-of-ram-stands-for-mohammad-muslim-appeasement/\