Fact Check: महात्मा गांधींनी खरंच सावरकरांना इंग्रजांची माफी मागण्यास सांगितले होते का?
विनायक दामोधर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली नव्हती. अशी भूमिका सातत्याने हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षांनी घेतली आहे. खासकरून भाजप आणि शिवसेनेने. तर दुसरीकडे सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. असा दावा सातत्याने कॉंग्रेससह अनेक बुद्धीजीवी लोक करत आहेत. तसे पुरावे देखील उपलब्ध आहेत.
मात्र, हिंदुत्ववादी पक्ष सावरकर माफीवीर नव्हते. अशी भूमिका सातत्याने घेत असताना देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह यांनी ही बाब मान्य करत सावरकरांनी माफी मागितली होती. ही बाब मान्य करताना राजनाथ सिंह यांनी नवीन इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसं तर सावरकरांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एक वर्ग सावरकरांना 'माफीवीर' म्हणतो तर दुसरीकडे आरएसएस आणि भाजप सावरकरांची मोठ्या प्रमाणात स्तुती करतात आणि त्यांना 'वीर' म्हणतात.
राजनाथ सिंह यांचा दावा काय?
महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिश सरकारसमोर दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते आणि त्यानंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. महात्मा गांधी यांनी सावरकरांची सुटका करावी असं आवाहनही केले होतं.
असा दावा राजनाथ सिंह यांनी केला होता.
काय आहे सत्य?
महात्मा गांधी यांनी खरंच सावरकरांना इंग्रजांना माफी मागण्यास सांगितले होते. या संदर्भात काही उजव्या विचारसरणीचे लोक काही पत्र सोशल मीडियावर व्हायरल करत आहे.
राजनाथ सिंह यांच्या या विधानाला आधार म्हणून जी पत्र व्हायरल केली जात आहे. त्यामध्ये कुठेही इंग्रजांची माफी मागा. असं सांगितल्याचं दिसून येत नाही.
गांधीजींनी सावरकरांच्या भावाला 25 जानेवारी 1920. सावरकरांच्या सुटकेसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे सांगितल्याचं दिसून येतं.
विशेष बाब म्हणजे सावरकरांनी आत्तापर्यंत इंग्रजांची अनेर वेळा माफी मागितल्याचं दिसून येतं.
1. 4 जुलै 1911 रोजी तात्याराव सावरकरांना पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं. सहा महिन्यात त्यांनी माफीनामा लिहून दिला.
2. दुसरं माफीचं पत्र सावरकरांनी 14 नोव्हेंबर 1913 रोजी लिहीलं.
3. मार्च 22 मार्च 1920 रोजी सावरकरांच्या समर्थकांनी कायदेमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारतर्फे अशी माहिती देण्यात आली की सावरकरांकडून दोन माफीनामे सरकारला प्राप्त झाले आहेत. 1914 आणि 1917 साली. त्याचा तपशीलही पटलावर ठेवण्यात आला.
4. 1930 साली त्यांनी पुन्हा एकदा इंग्रजांना माफीनामा लिहिला.
5. गांधी हत्या प्रकरणी अटक झाल्यावर सावरकरांनी फेब्रुवारी 22, 1948 रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना माफीनामा लिहून दिला. त्यात ते म्हणतात-- "I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require."
6. 13 जुलै 1950 रोजी, मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात सावरकर लिहीतात-- "... would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay" for a year.
एकंदरीत सावरकरांनी इंग्रजांना अनेक वेळा माफी मागितल्याचं दिसून येतं. मात्र, गांधीजींनी खरंच सावरकरांना इंग्रजांची माफी मागण्यास सांगतिले का? याचा विचार करता... महात्मा गांधी 1915 ला भारतात आले. मात्र, त्या अगोदर सावरकरांनी इंग्रजांची 1911 आणि 1913 साली माफी मागितली.
तरी सुटका झाली नाही म्हणून सावरकरांच्या भावाने हताश होऊन गांधीजींना विनंती केली.
(18 जानेवारी 1920) त्यात सावरकर तुरुंगात कसे आजारी आहेत, खचले आहेत हे कळवळून लिहिलं.
गांधीजींनी सावरकरांच्या भावाला काय सांगितले?
१) जनमत तयार करणे
२) व्यक्तिगत प्रयत्न.
या दोन बाबींचा समावेश असल्याचं दिसून येतं.
मात्र, यामध्ये कुठेही गांधीजींनी माफी मागण्यास सांगितल्याचं दिसून येत नाही.
या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने ज्येष्ठ इतिहासकार लेखक प्राध्यापक राम पुनियानी यांच्याशी बातचीत केली. त्यांनी राजनाथ सिंह यांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.
राम पुनियानी म्हणाले राजनाथ सिंह यांचं वक्तव्य हे हास्यास्पद: असून केद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य पुर्णतः काल्पनिक आहे.
राम पुनियानी यांना विनायक दामोधर सावरकर यांनी आत्तापर्यंत किती वेळा माफी मागितली असा सवाल केला असता, त्यांनी सावरकरांनी आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा माफीनामे लिहीले असल्याचं सांगितलं
ते म्हणाले सावरकरांनी 1908 साली माफीनामा लिहायला सुरूवात केली. तर महात्मा गांधी हे 1915 साली भारतीय राजकारणात सक्रीय झाले. सावरकरांचे माफिनामे हे गुडघ्यावर बसुन नाही तर रांगुन लिहीलेले आहे.
सावरकरांनी हिंदू राष्ट्रवादाचा पहिला विचार मांडला. सावरकर हे वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. मात्र, 1857 च्या उठावाला सर्वात आधी पुस्तक रूपात मांडण्याचे श्रेय सावरकरांना जातं. मात्र, हिंदू राष्ट्रासाठी सावरकर इंग्रजांपुढे नतमस्तक होते. भारत छोडो आंदोलनावेळी सावरकरांनी इंग्रजांना सैन्यभरतीसाठी मदत केल्याची माहिती सावरकरांनी दिली आहे.
तसंच सावरकर यांनी 'गांधींचा मार्ग हा आमचा मार्ग नाही' असं वक्तव्य केलं होतं. अशी माहिती दिली आहे. तसंच सावरकरांचं हिंदू राष्ट्रवादाचं राजकारण हे गांधींच्या सिध्दांतांच्या विरोधात असल्याची माहिती पुनियानी यावेळी दिली.
सावरकरांचा संविधान आणि राष्ट्रध्वज तिरंग्याला,बौध्द धर्माला देखील विरोध होता. गांधींचा सावरकरांना सल्ला म्हणजे राजनाथ सिंह यांची "कल्पना की उडान" आहे. असं म्हणत राम पुनियानी यांनी हा दावा फेटाळला आहे.
दरम्यान विदा सावरकर (आरोपी क्रमांक 32778) यांनी गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सदस्य सर रेजिनाल्ड क्रॅडॉक यांना 14 नोव्हेंबर 1913 रोजी एक खाजगी पत्र लिहिले होते.
त्यामध्ये सावरकर म्हणतात...
मी तुमच्या सहानुभूतीपूर्ण विचारांसाठी खालील मुद्दे मांडू इच्छितो: जेव्हा मी जून 1911 मध्ये येथे आलो, तेव्हा मला माझ्या सहकाऱ्यासोबत मला मुख्य आयुक्त कार्यालयात नेण्यात आले. तिथे मला 'ड' वर्ग कैदी म्हणजेच धोकादायक कैदी असा दर्जा दिला गेला. उर्वरित आरोपींना हा 'डी' दर्जा देण्यात आलेला नाही. यानंतर मला सहा महिने एकट्यालाच एका कोठडीत ठेवण्यात आले, बाकी आरोपींना तसे ठेवले नाही.
असं म्हणत एक बिघडलेला मुलगा सरकारच्या, पालकांच्या दारातून वगळता इतर कोठे परत येऊ शकतो? मला आशा आहे की सर कृपया या मुद्द्यांचा विचार करतील. अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं. या संपुर्ण पत्राचा अनुवाद या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. मात्र, या पत्रात कोठेही गांधीजींचा उल्लेख आपल्याला आढळत नाही.
https://www.maxmaharashtra.com/max-blog/savarkars-mercy-plea-to-british-government-1046191
काय आहे सत्य?
एकंदरीतच सावरकरांना गांधीजींनी माफी मागण्यास सांगितले होते. असा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे. मात्र, या संदर्भात कोणताही पुरावा अद्यापर्यंत समोर आलेला नाही.