Fact Check: दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकलेला झेंडा खालिस्तानी आहे का?

दिल्ली येथे काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. मात्र, या सगळ्या आंदोलनात चर्चा झाली ती म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकलेल्या झेंड्यांची. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खालिस्तानचा झेंडा फडकल्याचं ट्विट सोशल मीडियाावर व्हायरल झालं आहे. विशेष बाब म्हणजे हा झेंडा खालिस्तानी असल्याचं ट्विट verified account असलेल्या व्यक्तींनी देखील केलं असल्यानं नक्की हा झेंडा कोणता आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. १ लाख फॉलोअर्स असणाऱ्या अंकित जैन यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये देशाचा तिरंगा झेंडा काढून खालिस्तानचा झेंडा लावल्याचा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे हे ट्विटर अकांउट verified केलेलं आहे.
'Pakistan First' नावाच्या वेरिफाइड ट्विटर अकांउटवरुन असाच दावा करण्यात आला आहे.
चित्रपट समिक्षक सुमित कडेल यांनी देखील एएनआई चे दृश्य दाखवत एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यांनी देखील हा झेंडा खालिस्तानी असल्याचं म्हटलं आहे.
अशाच प्रकारचे ट्विट अनेक वेरिफाइड अकाउंट्स असलेल्या व्यक्तींनी केलं आहे. काय आहे सत्यता?
जेव्हा ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेले द क्विंट चे पत्रकार शादाब मोईजी यांनी हा झेंडा खालिस्तानचा नसल्याचं म्हटलं आहे.
साधारण दोन झेंडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिला झेंडा ( केशरी रंग )
शिख धर्माशी निगडीत असलेल्या निशंक साहिब चा आहे.
दुसरा झेंडा (पिवळा झेंडा)
दूसरा झेंडा शेतकरी संघटनांशी निगडीत एका संघटनेचा आहे.
पुढील दोन फोटो पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकलेला झेंडा हा शिख धर्माशी निगडीत असलेल्या निशंक साहिब चा आहे.
आता आपण एक नजर खालिस्तानी झेंड्यावर टाकू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की खालिस्तानी झेंडा कोणता?
पिवळा झेंडा शेतकरी संघटनांशी निगडीत असला तरी हा झेंडा कोणत्या संघटनांचा आहे. हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही. मात्र, हा झेंडा खालिस्तानी संघटनेचा नसल्याचं समोर आलं आहे. शेतकरी आंदोलनावर लेखन करणारे अमनदीप सिंह संधू सांगतात…
त्रिकोणी आकार असलेला पिवळा किंवा केशरी झेंडा शीख धर्माशी निगडीत आहे. हा खालिस्तानी झेंडा नाही. खालिस्तानी संघटनेचा विशेष असा झेंडा नाही. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणं हे प्रतिकात्मक होतं. त्याचा आणि खालिस्तानी झेंडाचा कुठलाही संबंध नाही किंवा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांचा झेंडा फडकवण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं.
देशातील नामांकीत पत्रकारांनी ट्विट करून झेंडा खालिस्तानी संघटनेचा नसल्याचं सांगितलं आहे.
Some media outlets are misleading people on flags. Nishaan Sahib has been hoisted. Some media houses claim Khalistan flags but no flags of Khalistan were present in rally. Please share responsibly, this is sensitive moment in Delhi.
एकंदरीत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकलेला झेंडा खालिस्तानी नसून शेतकरी संघटनेशी आणि शीख धर्माशी निगडीत आहे.
काही लोकांनी तिरंगा झेंडा काढून त्या ठिकाणी हा झेंडा लावल्याचा दावा केला आहे. मात्र, चित्रात स्पष्टपणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा डौलाने फडकत असल्याचं दिसून येत आहे.