Fact Check: देवेंद्र फडणवीस यांचा दावा गंगेत फक्त 50 मृतदेह आढळले, काय आहे सत्य?
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करत असताना गंगाकिनारी वाहणाऱ्या कोविड मृतदेहांची तुलना करत महाराष्ट्राची परिस्थिती अधिक बिकट असल्याचा दावा केला होता. मँक्स महाराष्ट्राच्या पडताळणी फडणवीस यांचा दावा चुकीचा असल्याचे सिद्ध झाले आहे.;
देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा कार्यकारिणीतील भाषण
आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाकिनारी उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून घेतलेल्या माहितीने जवळपास दोन हजारापेक्षा जास्त मृतदेह सापडल्याची कबूल केले आहे.
याबाबत इंडियन एक्सप्रेस ने देखील ग्राउंड रिपोर्ट केला असून वास्तविक सरकार दावा करत असल्या पेक्षा जास्त संख्येने मृतदेह विल्हेवाट नदीकिनारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड काळात अनेक मृतदेह नदीमध्ये सोडण्यात आले नदीकिनारी आलेले मुद्दे वाळुमध्ये पुरण्यात आले आता पाऊस झाल्याने नदी किनार चे मृतदेह हे बाहेर निघाले असून पुन्हा गंगा किनारे अनेक मृतदेह आढळून आल्याची बातमी द वायर ने दिली आहे.
पत्रकार बरखा दत्त यांनी प्रत्यक्ष गंगाकिनारी जाऊन स्थानिकांशी चर्चा केली त्यामध्ये मोठ्या संख्येने रोज मृतदेह तरंगत येत होते अनेक जाळण्यात आले आणि पुरण्यात आले असेही स्थानिकांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये आजही मोठ्या संख्येने मृतदेह पाण्यात सोडण्याचे प्रकार दिसून येत असून तीन महिन्यापूर्वी मातीमध्ये पुरलेले मृतदेह आता तरंगून वर येत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत .एनडीटीव्ही या संदर्भात एक बातमी आणि व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.
फडणवीस यांनी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना महाराष्ट्र सरकार कोविड काळात सर्वोत्तम काम केल्याचे पाठ थोपटून घेत आहे प्रत्यक्षात महाराष्ट्राची स्थिती बिकट असून बीड मध्ये एकाचा अंबूलन्स मध्ये 22 मृतदेह कोंडल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले होते.
याबाबतचे वृत्त टीव्ही नाईन सह
अनेक वृत्तवाहिन्यांनी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
प्रत्यक्ष चौकशी केली असता बीड मधील शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ दोनच रुग्णवाहिका होत्या. प्रशासनाने कोरोनाचं वाढतं संकट पाहता पाच अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. 17 मार्च 2021 रोजी जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणताही रुग्णवाहिका मिळालेली नाही, असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. रुग्णावाहिका नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.
गंगा नदी पात्रात 50 मृतदेह आढळल्याची एकच बातमी जानेवारी 2021 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर गेल्या पाच सहा महिन्यात हे सत्र सुरूच असून आज पर्यंत हजारो मृतदेह गंगाकिनारी आढळून आले आहेत. कोरोना रुग्ण संकेत महाराष्ट्र अव्वल असला तरी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याने मृतदेह होते व्यवस्थित विल्हेवाट करण्यात आले नदीपात्रात सोडण्याचे प्रकार महाराष्ट्रात आढळून आले नाहीत.
करोना संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी व पारदर्शक काम करताना सत्य आकडेवारी सांगितली आहे. याउलट ज्यांनी आकडेवारी लपवली, त्या राज्यांत मृतदेह गंगेच्या कडेला साचले होते,' अशी टीका महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
दुस-या कोरोना लाटेने रुग्णांचा मृत्यू वाढ असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली होती. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन करायला सुरुवात केली होती. सरकारने मनाई केल्यानंतरही लोक गंगेच्या काठावर मृतदेह पुरत आहेत. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसत असून त्यांची मोजदाद करणंही शक्य झालं आहे.
गंगेच्या काठावर मृतदेह दफन केले जात असल्याचे आणि गंगेत मृतदेह सोडल्या जात असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारवर टीकाही होत होती. देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती. मृतदेह दफन केल्यास किंवा नदीत सोडल्यास कारवाईचा इशारा देतानाच या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही करण्यात आली होती. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरले. विशेष म्हणजे प्रयागराजच्या श्रृंगवेश्वर धामजवळ मृतदेहांना दफन करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे घाटावर सर्वत्र प्रेतच दिसून येत आहेत. पोलीसही हा सर्व प्रकार मूकदर्शक बघून बघत असून कोणीही मृतदेह दफन करणाऱ्यांना रोखत नाहीये.
अर्थीचं सामानही घाटवरच
घाटावर मोठ्या प्रमाणावर मृतदेह दफन केले जात आहे. ही संख्या प्रचंड मोठी आहे. एवढेच नव्हे तर मृतदेहांशेजारी झेंडेही लावले जात आहेत. तसेच मृतदेहाशेजारीच अर्थीचं सामानही ठेवलं जात आहे. त्यामुळे गंगा नदीमध्ये प्रचंड कचरा झाला आहे. कोरोना महामारीमुळे मोठ्या संख्येने गंगा किनारी मृतदेह येत आहेत. पूर्वी एका दिवसाला 8 ते 10 मृतदेह येत होते. आता दिवसाला 60 ते 70 मृतदेह येत आहेत. कधी कधी हा आकडा शंभरच्यावरही जात आहे. प्रशासनाच्या मनाईनंतरही लोक मृतदेह घेऊन येत आहेत, असं येथील पंडितांचं म्हणणं आहे.
जुनी परंपरा
मृतदेह दफन करण्याची फार जुनी परंपरा आहे. शैव संप्रदायात मृतदेह दफन केले जातात. मृतदेह दफन करण्यापासून रोखू शकत नाही. कारण त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात, असं घाटावरील एका पंडिताने सांगितलं. जे लोक गरीब असतात, ज्यांच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसतात, ते लोक मृतदेह दफन करत असतात. आता कोरोनामुळे अनेक लोक हेच करत आहेत. या काळात पूर्वीपेक्षा अधिक मृतदेह दफन केले जात आहेत. स्नान घाटापर्यंत मृतदेह दफन केले जात आहे, असं श्रृंगवेश्वर घाटाच्या एका पुरोहिताने सांगितलं.
कोरोनाच्या दूस-या लाटेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.एकीकडे करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत असल्याचं चित्र असताना यादरम्यान गंगेच्या किनारी करोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे प्रशासन चिंतेत आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी लागलेला मृतदेहांचा ढीग पाहून गावकरीदेखील घाबरल्याचे स्पष्ट झाले होते.त्यामुळे फडणवीस यांनी केलेला दावा खोटा ठरत असून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्राची कोविड काळातील कामगिरी उत्तम असल्याचा निष्कर्ष निघत आहे.