Fact Check मागचं Fact Check भाग१ : पुण्यात खरंच पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्या होत्या का?

२३ सप्टेंबर २०२२ ला पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीयाचा मोर्चा केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींविरोधात निघाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्च्यामध्ये पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्याचा दावा काही व्हायरल व्हिडीओंमधून करण्यात आला. त्याचं फॅक्ट चेक अल्ट न्युज कडून करण्यात आलं मग त्यांचं फॅक्ट चेक खोटं असल्याचा दावा टीव्ही वृत्तवाहिनी साम टीव्ही ने केला. या सगळ्यामागचं नेमकं सत्य काय आहे जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रच्या या फॅक्ट चेक मागचं फॅक्ट चेक भाग १ मध्ये!;

Update: 2022-09-30 11:21 GMT

संपुर्ण देशभरामध्ये २२ सप्टेंबर २०२२ ला राष्टीय तपास यंत्रणा (NIA), अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि पोलिसांना PFI च्य़ा नेत्यांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये PFI च्या तब्बल १०० नेत्यांना ताब्या घेतलं गेलं. PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया अशी २००७ मध्ये स्थापन झालेली एक मुस्लिम राजकीय संघटना आहे. जी अल्पसंख्यांकांच्या न्यायहक्कांसाठी काम करत असल्याचा दावा करते. २२ सप्टेंबर ला छापेमारी करण्यात आल्यानंतर देशभर PFI च्या कार्यकर्त्यांनी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याच अंतर्गत पुण्यात देखील पीएफआय चं आंदोलन झालं. ज्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबाद चा नारा दिल्याचा दावा अनेक माध्यमांनी आणि महत्वाच्या ट्विटर हॅंडल्स ने केला होता. ज्यामुळे पुण्यातील या आंदोलनावर प्रचंड टीका झाली. अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मनसे अध्य७ राज ठाकरे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी कोणतीही शहानिशा न करता टीका देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं.

या सगळ्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये PFI चे काही तरूण कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनमध्ये बंदिस्त असलेले पाहायला मिळत आहेत आणि की आंदोलक खालून मोठमोठ्याने घोषणा देत आहेत. शिवाय या मध्ये या आंदेलकांनी पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्याचा दावा केला जातोय. या आंदोलनातील PFI च्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं पुणे पोलिसांनी आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे.



 माध्यमांमध्ये चाललेल्या बातम्या

२४ सप्टेंबर २०२२ ला प्रसिध्द वृत्तसंस्था एएनआय ANI ने ट्विट केले की, "आदल्या दिवशी पुणे शहरातील जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे ऐकू आले, जेथे पीएफआय कॅडर त्यांच्या संस्थेविरुद्ध पडलेल्या ईडी-सीबीआय-पोलिसांच्या छाप्यांचा निषेध करण्यासाठी जमले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी काही आंदोलकांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले." या शिवाय ANI न सांगितलं की व्हिडीओचा ऑडिओ जरी स्पष्ट नसला तरी घटनास्थळी उपस्थित पत्रकारांनी या घटनेची पुष्टी केलेली आहे.


सोशल मिडीयावर सर्वात आधी हा व्हिडीओ पोस्ट करणारी व्यक्ता होती ANI चे पत्रकार इंद्रजीत चौबे!


ANI नंतर लागलीच या व्हिडीओ वर बातमी प्रसिध्द करणाऱ्या माध्यमसमुहांमध्ये टाईम्स नाऊ ही वाहिनी अग्रस्थानी होती.


झी न्यूजच्या पत्रकार शिवांगी ठाकूर यांनी त्याच दाव्यासह दुसर्‍या अँगलने शुट झालेला व्हिडिओ पोस्ट केला आहे.

इतकंच नाही तर या सर्व वृत्त समुहांनी या बातमीचं प्रसारण केल्यानंतर जर राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रीया आली नसती तर नवल वाटलं असतं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेते प्रमुख राज ठाकरे यांनी तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहुन ट्विट केलं ज्यात त्यांनी अशा देशविरोधी घोषणा होणार असतील तर देशातील हिंदू ही शांत बसणार नाही असं म्हटलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या व्हायरल व्हिडीओवर शिवरायांच्या भुमित असले नारे सहन केले जाणार नाहीत असं म्हटलं आहे.


याशिवाय राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांना या संदर्भात प्रतिक्रीया दिली असून ती ट्विट देखील केली आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असं म्हटलं आहे.


नेमकं सत्य काय आहे?

पुण्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही दावा करण्यात आलेली पाकिस्तान झिंदाबाद या घोषणेचं सत्य पडताळण्यासाठी संबंधीत घटनेचे इतरही व्हिडीओ आम्ही पाहिले. कथित घटनेच्या अनेक व्हिडीओपैकी आम्ही जे घटनास्थळी पत्रकार उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा करून काही व्हिडीओज मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्हाला असे दोन व्हिडीओज मिळाले जे दुसऱ्या अँगलने चित्रित झाले होते शिवाय त्यात व्हायरल व्हिडीओमधील कथित घटना देखील चित्रित झाली होती. त्या व्हिडीओपैकी एक व्हिडीओ आपण खाली पाहू शकता. त्या आधी व्हायरल व्हिडीओ आपण पाहायला हवा.

Full View


या व्हिडीओच्या १७ व्या सेकंदा पासून जर आपण पाहिलं तर आपल्याला पोलिस व्हॅन दिसतेय आणि त्याचवेळी आंदोलक घोषणा देखील देत आहेत. त्यात जर आपण पाहिलं तर आपल्याला व्हिडीओ सुरू झाल्यानंतर ३ ऱ्या सेकंदापासून १७ व्या सेकंदा पर्यंत पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा ऐकू येत आहेत. यासाठी आम्ही संदर्भ बिंदू असणारी पोलिस व्हॅनची दृश्ये असणाऱ्या व्हिडीओ शोधू लागलो तेव्हा देन व्हिडीओ आम्हाला मिळाल्या. त्यापैकी एक पत्रकार वर्षा तोरगळकर आणि दुसरा फेसबुक पेज पोलिसनामा चं थेट प्रसारण होतं.

पोलीसनामा लाईव्ह कव्हरेज

पोलीसनामाने या घटनेचा फेसबुक लाइव्ह व्हिडिओ प्रकाशित केला आहे ज्यामध्ये जमिनीवर काय घडले ते दाखवले आहे. लाइव्ह व्हिडिओमध्ये 4:18 पासून आंदोलकांना पोलिस व्हॅनमध्ये ढकलताना दिसत आहे. व्हॅनचा दरवाजा शेवटी थेट व्हिडिओच्या 7:10 च्या चिन्हावर बंद होतो. व्हॅन 7:56-चिन्हावर फिरू लागते.

Full View)

7:43 वाजता लाइव्ह व्हिडिओमधील संबंधित भाग व्हायरल क्लिपमध्ये शेअर केलेली घोषणा दाखवते. यावेळी, "पॉप्युलर फ्रंट झिंदाबाद" असा नारा दिला जात होता जो स्पष्टपणे ऐकू येतो. वाचकाने हे लक्षात घ्यावे की या परिच्छेदामध्ये निर्दिष्ट केलेल्या घटनांची साखळी देखील 14-15 सेकंदांच्या कालावधीत घडली, जसे की व्हायरल व्हिडिओमध्ये (वर उल्लेख केला आहे). फेसबुक लाईव्ह व्हिडिओची संबंधित क्लिप खाली पाहिली जाऊ शकते.

Full View

या खाली आम्ही या दोन व्हिडीओची तुलना केली आहे. वर दाखवलेली व्हिडीओ ही पोलिसनामाची व्हिडीओ आहे आणि त्याखाली व्हायरल होत असलेली व्हिडीओ ज्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा दावा केला जातोय.

Full View

एकंदरीत पोलिसनामाचं संपुर्ण १२ मिनिटांचं Live पाहिल्यानंतर आमच्या एक निदर्शनास आलं की त्या संपुर्ण व्हिडीओमध्ये एकदाही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत.

या घटनेच्या आणखी काही विविध अँगलने चित्रीत केलेल्या व्हिडीओज....

पत्रकार वर्षा तोरगळकर यांनी देखील या घटनेच्या काही व्हिडीओज शेअर केल्या होत्या. (https://twitter.com/varshasuman/status/1573649570025902081)

या व्हिडीओंमध्येही आपल्याला कुठेच पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिलेल्या ऐकू येत नाहीत.

यामध्ये सिध्द होतं की पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा PFI च्या आंदोलनादरम्यान दिल्या गेल्याच नाहीत. पण साम टीव्ही ने काही दिवसांपुर्वी पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्या असून तसा एक व्हिडीओ देखील दाखवला गेला आहे. 

Full View

सामच्या या दाव्यामागचं सत्य पहा या फॅक्ट चेक मागील फॅक्ट चेक च्या दुसऱ्या भागात...


टीप : सदर फॅक्ट चेक हे अल्ट न्युज ने देखील केलं आहे

Tags:    

Similar News