Fact check - राष्ट्रपतींनी नेताजींचा चुकीच्या पोट्रेटचं उद्घाटन केलं का?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एवजी अभिनेता प्रसन्नजीत यांचं नेताजींच्या वेषातील चित्र प्रसिद्ध केल्यामुळे राष्ट्रपती रामराथ कोविंद ट्रोल झाले होते. नेटवरील अनेक मान्यवर लोकांनी या बाबत ट्वीट करून नापसंती दर्शवली होती.
मात्र खुद्द नेताजींच्या परिवारानेच याबाबत खुलासा केल्यानंतर आता या वादावर अधिक प्रकाश पडला आहे. सी के बोस यांनी नेताजींचं एक चित्र पोस्ट केलं आहे. या चित्राला नेताजींच्या पोट्रेट शी पडताळून पाहिलं असतं सोशल मिडीयावरील व्हायरल पोस्ट मधला दावा खोटा असल्याचं स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपतींनी उद्धाटन केलेलं पोट्रेट हे सुभाषचंद्र बोस यांचेच असल्याचं स्पष्ट झाले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोसंदर्भातील वाद आता मिटला असला तरी हा वाद निर्माण करणाऱ्या काही सेलिब्रिटी ट्वीटर हँडल वर मात्र आता सरकारने कारवाई सुरू केलली आहे.
लिंक -
https://www.thenewsminute.com/article/fact-check-photo-unveiled-president-subhash-chandra-bose-not-actor-prosenjit-142153