Fact Check : पंजाबबाबत आम आदमी पक्षाविरोधात रविश कुमार यांनी ट्वीट केले आहे का?

पंजाब निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर रविश कुमार यांनी केले आप विरोधात ट्वीट?;

Update: 2022-02-14 07:33 GMT

 देशातील पाच राज्यात निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यातच पंजाब जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने जोर लावला आहे. तर आपच्या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी ट्वीट करत भगवंत मान यांच्यासाठी मत मागण्यासाठी धुरी जात असल्याचे सांगितले आहे. त्या ट्वीटला कोट करत रविश कुमार यांचे आम आदमी पक्षाच्या विरोधातील ट्वीट व्हायरल होत आहे. पण रविश कुमार यांच्या ट्वीटचे व्हायरल होत असलेल्या इन्फोग्राफिक्सची सत्यता जाणून घेण्यासाठी वाचा....




 



पंजाब निवडणूकीदरम्यान सोशल मीडियावर एक इन्फोग्राफिक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.





 


ज्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी ट्वीट करत भगवंत मान यांच्यासाठी मत मागायला मुलीसोबत पंजाबमधील धुरी येथे जाणार असल्याचे म्हटले होते. त्याला रविश कुमार यांनी कथीत कोट केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

सुनीता केजरीवाल यांनी केलेल्या ट्वीटला कोट करत रविश कुमार यांनी पंजाबला जाण्याआधी दिल्लीच्या कस्तुरबा नगरमधील ज्या मुलीवर बलात्कार झाला तिच्या घरी जायला हवे होते. कदाचित शीख मतांच्या राजकारणासाठी 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागला नसता, असे कथीत मत व्यक्त केले आहे. तर तसंही दिल्लीचं कोणाला काय पडलं आहे? अशा आशयाचे कथित कोट व्हायरल होत आहे. तर या ट्वीटमध्ये #Chunavjivi हा हॅशटॅग वापरला आहे. याबरोबरच रविश कुमार यांच्या पंजाबी ट्वीटचा पंजाबी भाषेत अनुवाद केल्याचे इन्फोग्राफिक्स शेअर होत आहे.

रविश कुमार यांच्या कथीत ट्वीटमध्ये ज्या महिलेचा उल्लेख केला आहे. त्या महिलेचे गेल्या महिन्यात अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत मारहाण केल्याची घटना घडली होती. तर त्यानंतर त्या महिलेचे मुंडन करून पुर्ण परिसरात फिरवले होते. या प्रकरणात दिल्लीतील 16 पुरुष आणि स्रीयांना अटक करण्यात आली आहे. मात्र दरम्यान हे इन्फोग्राफिक्स फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.

पडताळणी : रविश कुमार यांच्या नावाने व्हायरल होत असलेले कथीत ट्वीट विवादास्पद असल्याने त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असते तर हा विषय माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला असता. मात्र त्यावर कोणत्याही माध्यमाने दिलेले वृत्त नाही. त्यानंतर अल्ट न्यूजने वेबॅक मशीनवरही ट्वीट शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू रविश कुमार यांचे अशा प्रकारचे ट्वीट असल्याचे आढळले नाही.


याव्यतिरीक्त गेल्या महिन्यात सामुहिक बलात्कार प्रकरणाची शिकार ठरलेल्या महिलेची निश्चित अशी ओळख समोर आलेली नाही. तसेच न्यूज लाँड्रीने दिलेल्या वृत्ताचा स्क्रीनशॉट खाली दिलेला आहे. त्यामध्ये पोलिस आणि पीडितेच्या परिवाराची प्रतिक्रीया देण्यात आली आहे. त्यामध्ये पीडिता आणि आरोपी दोन्हीही भेडकुट समाजाच्या आहेत. तर पीडितेच्या परिवाराने दिलेल्या कागदपत्रांच्या दाखल्यावरून पीडितेचा परीवार हिंदू आहे. मात्र शीख रीती-रिवाजेही पालन करतात.





 


निष्कर्ष : अल्ट न्यूजने रविश कुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर रविश कुमार यांनी सांगितले की, व्हायरल होत असलेले कथीत ट्वीट पुर्णतः खोटे आहे. तसेच या ट्वीटसंदर्भात पंजाबमधील अनेक लोकांनी संपर्क केला. ज्यामध्ये हे ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रविश कुमार यांनी हे विधान खोटे असल्याचे सांगितले.

अशा प्रकारचे कथीत ट्वीट पहिल्यांदाच व्हायरल होत नाहीत. तर रविश कुमारला चुकीचे ठरवण्यासाठी अशा प्रकारचा खोडसाळपणा केला जातो. याआधीही रविश कुमारविषयी चुकीच्या बातम्या पसरवून रविश कुमारला ट्रोल करण्यात आले आहे.

या संदर्भात alt news ने Fact Check केलं आहे.

पंजाब चुनाव से पहले रवीश कुमार का फ़र्ज़ी ट्वीट शेयर, AAP को टारगेट करते हुए दिखाया गया

Tags:    

Similar News