Fact Check : संबित पात्रा यांनी शेअर केलेले फोटो 'सपा'च्या काळातील आहेत का?
निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपा आणि समाजवादी पक्षाकडून एकमेकांवर टीका करायला सुरूवात केली आहे. त्यातच भाजपाकडून समाजवादी पक्षाच्या काळातील तर समाजवादी पक्षाकडून भाजपाच्या काळातील फोटो शेअर करत एकमेकांची पोलखोल सुरू आहे.
भाजपा प्रवक्ते सांबित पात्रा यांनी 4 जानेवारी 2022 रोजी एक ग्राफिक्स ट्वीट केले. तर फोटोमध्ये 2017 सालापुर्वी समाजवादी पक्षाचे सरकार असताना आणि 2017 नंतर योगींच्या सरकाच्या काळातील विकासकामांची तुलना केली आहे. त्यामध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. तर त्यात तीन तीन फोटो शेअर केले आहेत. तर त्या फोटोंमध्ये 2017 पुर्वीच्या काळातील प्राथमिक शाळांची खराब स्थिती दिसत आहेत. याबरोबरच 2017 नंतर प्राथमिक शाळांची अवस्था चांगली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत शाळेतील मुले प्रयोगशाळेत दिसत आहेत. त्या फोटोखाली लिहीले आहे की, "सोच ईमानदार काम दरदार". सांबित पात्रा यांनी हे ग्राफिक्स ट्वीट करताना म्हटले आहे की, फर्क साफ दिख रहा है. (ट्वीटची अर्काइव्ह लिंक)
सांबित पात्रा यांनी हे ग्राफिक्स फेसबुकवरही पोस्ट केले आहे. तर हा फोटो शेकडो वेळा शेअर केला आहे.
पडताळणी
अल्ट न्यूज सांबित पात्राने शेअर केलेल्या आणि ग्राफिक्समध्ये दाखवण्यात आलेल्या फोटोंची सत्यता समजावून देणार आहे.
2017 पुर्वीचे तीन फोटो-
1) सांबित पात्रा यांनी शेअर केलेले फोटो गुगल लेंसच्या माध्यमातून अल्ट न्यूजला 7 जानेवारी 2021 रोजी अमर उजालाचे आर्टिकल मिळाले. रिपोर्टमधील फोटो हा जफरपुर गावातील शाळेचा असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्या लेखात प्राथमिक शाळेच्या खराब स्थितीबद्दल सांगितले होते. तर मीडिया रिपोर्टमधील माहितीनुसार जिल्ह्यातील 951 मधील 111 शाळेंची स्थिती खराब दिसून आली.
2) या ग्राफिक्समध्ये दाखवलेला दुसरा फोटो झुम करून पाहिले असता फोटोवर 8 ऑगस्ट 2018 रोजी 10 वाजून 25 मिनिट ही वेळ दिसत आहे.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजने 8 ऑगस्ट 2018 रोजी Uttarpradesh.org चा लेख मिळाला. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा फोटो उत्तर प्रदेशातील चित्रकूटच्या अमानपुर प्राथमिक शाळेचा आहे.
3) गुगल लेंसच्या माध्यमातून सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजला हा फोटो 17 डिसेंबर 2020 रोजी न्यूज अड्डाच्या लेखात मिळाला. हा फोटो कुशीनगरच्या सुकरौली मध्ये हेडा पडरी क्षेत्रातील शाळेचा आहे. तर रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शाळेचे निरीक्षण करण्यास पोहचल्यानंतर अधिकाऱ्याला शाळेच्या दरवाजाला कुलूप लावलेले दिसले. तर शाळा शिक्षकाच्या गैरहजेरीच्या कारणामुळे बंद होती. त्यामुळे तपास अधिकाऱ्याने सांगितले की या प्रकरणात योग्य कारवाई करण्यात येईल.
वरील फोटो आणि त्यासंबंधीत रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार सांबित पात्राने शेअर केलेले 3 फोटो समाजवादी पक्षाच्या कार्यकाळातील असल्याचा जो दावा करण्यात आला आहे. तर ते सर्व फोटो योगी सरकारच्या कार्यकाळातील आहेत.
2017 नंतरचे 3 फोटो-
रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजच्या असे निदर्शनास आले की, उर्वरित 3 फोटो Y. Satya Kumar यांनी 3 जानेवारी रोजी ट्वीट केले होते. ते भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपा उत्तर प्रदेश चे को-इनचार्ज आहेत. त्यांनी हे फोटो उत्तरप्रदेशात सरकारी शाळेचे असल्याचे सांगण्यात आले आहेत.
याव्यतिरीक्त ट्वीटर वापरकर्ता आर्यन मिश्रा यांनी हा फोटो बुलंदशहरच्या सरकारी शाळएचा असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये एका फोटोवर 'सरला ठकराल एस्ट्रोनॉमी लॅब' असे लिहीले आहे.
युट्यूबवर सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजला माहिती मिळाली की, उत्तरप्रदेशात बुलंदशहर मध्ये नवे शिक्षण धोरण 2020 समोर ठेऊन ओपरेशन कायाकल्प अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील एस्ट्रोनॉमी लॅब बनवल्या जात आहेत. त्यानुसार अनेक शाळेत प्रयोगशाळा बनवल्या जात आहेत.
द लल्लन टॉप 2019 मध्ये बुलंदशहरमधील सिकंदराबादच्या एका गावात पोहचून रिपोर्टमध्ये शाळेची खगोलशास्राची प्रयोगशाळा दाखवली होती.
निष्कर्ष : ज्याप्रकारे अल्ट न्यूजने केलेल्या पडताळणीत असे आढळले की, सांबित पात्राद्वारे शेअऱ केलेले फोटो 2017 नंतरचीच आहे. मग ती शाळेच्या खराब स्थितीची असो वा शाळेत सुरू केलेल्या खगोलशाळा असो. मात्र यापैकी एकही फोटो समाजवादी पार्टीच्या कार्यकाळातील नाही. याचा अर्थ भाजपा प्रवक्ते सांबित पात्रा यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळाचे गुणगाण गाण्यासाठी खराब स्थितीच्या शाळेंचे फोटो शेअर केले. मात्र ते सर्व फोटो भाजपा कार्यकाळातीलच आहेत, असे आढळून आले आहे.