मार्च 2020 मध्ये कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी अनेक घरगूती उपाय असल्याचा दावा केला जात होता. त्यापाठोपाठ आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर सुकलेली आदरक म्हणजेच सुंठीच्या वापराने ओमायक्रॉन बरा होत असल्याचा दावा केला जात आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअऱ केला जात आहे. ज्यात एक व्यक्ती कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनला प्रतिबंध करण्यासाठी सुंठीचा वास घेण्याचा सल्ला देत आहे. तर त्याने आदरकचे अनेक पॅकेट विकले असल्याचा दावा केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत या व्यक्तीचे नाव डॉक्टर जरीर उदवाडिया किंवा डॉक्टर सुशील राजदान असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ 4 लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेल्या 'काश्मीर एक्सप्रेस न्यूज'ने डॉ. राजदान असल्याचा दावा केला आहे.
अल्ट न्यूजच्या व्हॉट्सएप नंबर (+91 7600011160) या क्रमांकावर या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी अनेक रिक्वेस्ट आल्या. त्यानंतर अल्ट न्यूजने या व्हिडीओच्या सत्यतेची पड़ताळणी केली आहे.
पडताळणी
या व्हिडीओत दिसत असलेल्या व्यक्तीची ओळख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी केली जात आहे. त्यावरून हा व्हिडीओ भ्रामक असल्याचे स्पष्ट होत आहे.
अल्ट न्यूजने कि-वर्ड सर्च करत दोन्ही डॉक्टरांची माहिती काढली. त्यामध्ये असे स्पष्ट झाले की, डॉ. उदवाडिया मुंबईतील आहेत. तर डॉ. राजदान जम्मू येथील लोकप्रिय डॉक्टर आहेत.
संस्कती मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार डॉ. उदवाडिया यांनी 2018 मध्ये 'आयुटब्रेक : एपिडेमिक्स इन ए कनेक्टेड वर्ल्ड' या प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते. तर प्रसिध्दीपत्रकात डॉ. उदवाडिया यांना प्रसिध्द डॉक्टर आणि संशोधक असे संबोधले गेले होते. तर 2016 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने डॉ. उदवाडिया यांच्या इनपुटच्या आधारे त्यांच्यावर फीचर स्टोरी लिहीली होती.
अशाच प्रकारे डॉ. राजदान हे जम्मूतील सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट आहेत. तर एप्रिल 2021 मध्ये वृत्तसंस्था IANS ने एक ट्वीट केले होते. त्यात कोविड संक्रमणाशी संबंधीत त्यांच्या विधानाला कोट केले होते.
अल्ट न्यूजने व्हायरल व्हिडीओत दिसत असलेल्या व्यक्तीची या दोन्ही डॉक्टरांशी तुलना केली. त्यात दोन्ही डॉक्टरांशी व्हायरल होत असलेल्या व्यक्तीचा चेहरा वेगळा असल्याचे दिसत आहे. तर डॉ. उदवाडिया यांचा फोटो त्यांच्या गुगल प्रोफाईलवरून घेतली आहे. तर डॉ. राजदान यांचा फोटो वृत्तसंस्था असलेल्या IANS च्य ट्वीटमधून घेतली आहे.
व्हायरल होत असलेला व्यक्ती डॉ. उदवाडिया यांच्यासारखा नाही. मात्र डॉ. राजदान यांच्याशी तुलना केली असता काही समानता दिसून येत आहेत. तर जम्मू येथील माध्यमसंस्था द स्ट्रेट लाइन यांनी 9 जानेवारी रोजी हा दावा फेटाळून लावला. तर राजदान यांनी बुमलाईव्हशी बोलताना त्या व्हिडीओत ते नसल्याचे सांगितले. तर त्यांनी पुढे म्हटले की, सुंठीचा वास घेऊन ओमायक्रॉन संक्रमण थांबवता येत असल्याचा दावा खोटा आहे. तर त्याला Immunomodulatory effectsकोणताही वैज्ञानिक आधार नाही, असे डॉ. राजदान यांनी सांगितले.
अल्ट न्यूजच्या विज्ञान संपादक डॉ. सुमैय्या शेख आणि डॉक्टर शरफरोज सतानी यांनी गेल्या वर्षी एका सायन्स चेक मध्ये हा विषय विस्तृतपणे समजावला होता. सुंठीचा व्हायरल इन्फेक्शनवर प्रभाव सांगणारा कोणताही शोध अजून लागला नाही. स्टीफेनो, D. et al.(2019) च्या एका संशोधनात 10 निरोगी लोकांना एखिनेसिया अंगस्टीफोलिया आणि जिंगीबर ऑफिशिनेल (अदरक) चे मिश्रण दिल्यानंतर त्यांच्यावर प्रतिकारशक्तीवर त्याचा प्रभाव होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी प्रतिकारशक्तीसाठी काम करणाऱ्या पांढऱ्या पेशींमधील जीनवरचे एक्सप्रेशन मोजले. त्यामध्ये ल्युकोसायईटच्या 500 जीनवर त्याचा परीणाम झाल्याचे दिसून आले. यावरून असे स्पष्ट होते की, ल्युकोसाईट ची प्रक्रीया इन्फ्लमेशन दाबण्यासाठी होत होती. जी प्रतिकारशक्तीची प्रतिक्रीया असते. यावरून असे दिसून आले की, प्रतिकारशक्ती दाबण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग स्टेरॉइडप्रमाणे होत आहे.
गेल्या वर्षी मेरीलँड विश्वविद्यालयात VP/ चीफ क्वॉलिटी अधिकारी ऑफ डीसिज डॉ. फहीम युनुस यांनीही या बातमीचे खंडन केले की, अदरकने कोरोनाचा उपचार होऊ शकतो.
निष्कर्ष- वरील सर्व मुद्द्यांवरून असे दिसून येते की, सुंठीचा वापर करून कोरोनाचा उपचार करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा दावा खोटा आहे. तर डॉ. उदवाडिया आणि डॉ. राजदान हे आपापल्या क्षेत्रातील सुप्रसिध्द डॉक्टर आहेत. त्यांच्या नावाचा आणि सुप्रसिध्द असण्याचा वापर चुकीचा दावा करण्यासाठी केला जात आहे.
सूखे अदरक से ओमिक्रॉन ठीक होने का दावा भ्रामक और वैज्ञानिक रूप से निराधार है