भाजपा सत्तेत येत असल्याचा मुलायम सिंह यांनी केलेला दावा खरा आहे का?

Update: 2022-01-01 02:00 GMT

सोशल मीडियावर एका न्यूज चॅनलचे एक ग्राफिक्स व्हायरल होत आहे. त्यामध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे विधान कोट केले आहे. उत्तरप्रदेशात आगामी काळात होत असलेल्या निवडणूकींचा संदर्भ देत मुलायमसिंह यांचे कथीत विधान शेअर केले जात आहे. त्यातील पहिल्या विधानात म्हटले आहे की, मुझे बीजेपी सत्ता में आती दिख रही है.' त्याचबरोबरच आणखी एक ग्राफिक्स शेअर केले गेले आहे. ज्यामध्ये मुलायम सिंह यादव बोलताना दाखवले आहेत की, राष्ट्रवाद, सीमा आणि भाषा यावर भाजपा आणि सपा या पक्षांची विचारधारा एकच असल्याचे म्हटले आहे.

या विधानावरून अनेक वापरकर्त्यांनी हा फोटो शेअर करत RSS आणि अखिलेश यादव हे मिळाले आहेत, असा आरोप करत त्यांच्यावर कठोर टीका केली आहे.


काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या विधानांवरून मुलायमसिंह यादव आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची काही दिवसांपुर्वी झालेली भेट दाखवत तो फोटो जोडला आहे. ही भेट दिल्ली मधील उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नातीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये झाली होती.


Full View

AIMIM ची ओळख दाखवत असलेल्या एका वापरकर्त्यानेही हाच दावा शेअर केला आहे.


Full View

पडताळणी

भाजपा सत्तेत येताना दिसत आहे आणि राष्ट्रवाद, सीमा आणि भाषा या मुद्दयावर भाजपा आणि सपा यांचा विचार एकच असल्याचे कथीत विधान मुलायमसिंह यांनी केले असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यातील तथ्य पडताळणी करताना अल्ट न्य़ूजने पाहिले. त्यात ज्या व्हिडीओमध्ये हे ग्राफिक्स वापरले आहे. ते 2017 मध्ये सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे हे सिध्द होते की, मुलायम सिंह यादव यांचे विधान 2022 मधील उत्तरप्रदेश निवडणूकीशी जोडले जाऊ शकत नाही.


Full View

Google वर key-words सर्च केले असता 2015 मधील एक व्हिडीओ मिळाला. ज्यामध्ये न्यूज चॅनलने हा व्हिडीओ अपलोड केला होता. त्या व्हिडीओच्या डिस्क्रीप्शन बॉक्समध्ये 'लखनऊ :सोमवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी लाट ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असल्याचे म्हटले होते. तर भगवा पक्ष बिहारमध्ये सरकार बनवत असल्याचे म्हटले होते.


Full View

2015 मध्ये बिहार निवडणूकीच्या पुर्वी इतर वृत्तवाहिन्यांनी या विधानावर रिपोर्ट प्रसिध्द केले होते. तर हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, बिहार निवडणऊकीत लडण्यासाठी राजकीय पक्षांना सोबत घेऊन मुलायम सिंह यांनी महागठबंधन ने पढे केले होते.

Full View

निष्कर्ष

वरील सर्व मुद्दे लक्षात घेतल्यास बिहार निवडणूकीपुर्वी मुलायम सिंह यादव यांचे विधान तोडून मोडून वेगळ्या पध्दतीने शेअर केले आहे. त्यामुळे जुना दावा पुन्हा शेअर करून मुलायमसिंह यांची प्रतिमा डागाळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यावरून 2015 आणि 2017 चा दावा 2022 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शेअर करून मुलायम सिंह यादव यांची प्रतिमा डागाळून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.


मुलायम सिंह यादव के 2015 के बयानों को हाल के यूपी चुनाव से जोड़कर शेयर किया गया

Tags:    

Similar News