Fact Check : राधाकृष्ण विखे पाटील समाजवादी पक्षात गेल्याचे वृत्त का दिले गेले?

उत्तरप्रदेश निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. तर उत्तरप्रदेशात पक्षांतराला वेग आला आहे. त्यातच उत्तरप्रदेशातील तीन मंत्र्यांनी आणि पाच आमदारांनी भाजपाला नारळ देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजपाच्या विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यातच प्रतिक पाटील यांनी एक News 24 चा एक व्हिडीओ ट्वीट केला.

Update: 2022-01-13 14:53 GMT

भाजपातून समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्य आमदारांचे ग्राफिक्स दाखवण्यात येत होते. त्यात राधाकृष्ण वर्मा यांच्या जागी महाराष्ट्रातील भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो असल्याचे दिसून आले. तर या ट्वीटमध्ये प्रतिक एस पाटील यांनी लिहीले आहे की, यूपीत भाजपला तिसरा झटका खतरनाक लागलाय. एकदा पहाच.



प्रतिक पाटील यांनी केलेल्या ट्वीटनंतर न्यूज २४ ने बातमीत हा फोटो वापरला आहे का? याची सत्यता पडताळणी मॅक्स महाराष्ट्रच्या टीमने केली.

पडताळणी-

मॅक्स महाराष्ट्रने टीमने उत्तरप्रदेश निवडणूकीतील न्यूज २४ चे युट्यूबवरील व्हिडीओ पाहिले. त्यामध्ये विविध मंत्र्यांनी आमदारांनी पक्षांतर केल्याच्या बातम्या होत्या. मात्र की-वर्ड सर्च केल्यानंतर मॅक्स महाराष्ट्र ला न्यूज 24 चा खेला होबे vs मेला होबे हा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपा सोडलेल्या आमदारांची आणि मंत्र्यांची माहिती देण्यात येत होती. त्यामध्ये अवतार आमदार असलेले अवतार सिंह भडाना, मंत्री दारा सिंह चौहान आणि राधाकृष्ण वर्मा असे भाजपा सोडलेल्या मंत्री आमदारांची नावे ग्राफिक्सच्या माध्यमातून देण्यात येत होते. त्यामध्ये तिसरे नाव राधा कृष्ण वर्मा यांचे होते. मात्र त्यांच्या जागी महाराष्ट्रातील भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो जोडण्यात आला होता.

Full View

राधा कृष्ण वर्मा यांचा फोटो-


निष्कर्ष-

युपीत सुरू असलेल्या रणसंग्रमात भाजपा सोडलेल्या मंत्री आमदारांचा प्रतिक पाटील यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ न्यूज 24 चाच आहे. मात्र त्यामध्ये राधाकृष्ण वर्मा यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो जोडण्यात आला आहे.

Tags:    

Similar News