Fact Check : आम आदमी पक्षाच्या रॅलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत दावा

Update: 2022-04-06 14:37 GMT

आम आदमी पक्षाने (AAP) काढलेल्या गुजरातमधील रॅलीबद्दल द न्यूयॉर्क टाइम्सने (NYT) कथित वृत्त दिले आहे. त्या वृत्तात लिहीले आहे की, गुजरातमध्ये 25 कोटी लोक या रॅलीत सहभागी झाल्याचे म्हटले आहे. तर हा आपच्या रॅलीचा वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचे म्हटले आहे. ही बातमी मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. त्यामुळे या बातमीतील तथ्य काय? हे जाणून घेण्यासाठी वाचा....

आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला. त्यानंतर आप आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. गुजरात मध्ये 2022 अखेरीस निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर 'द न्यूयॉर्क टाइम्स (NYT) मध्ये प्रसिध्द झालेल्या एका कथीत रिपोर्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या बातमीच्या हेडलाईनमध्ये आम आदमी पक्षाने एका राजकीय रॅलीत सगळ्यात जास्त लोक एकत्र करत जागतिक रेकॉर्ड बनवल्याचा दावा केला आहे. तर या बातमीच्या उपशीर्षकात पंजाबमधील निवडणूकीतील विजयानंतर गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीत 25 कोटी लोक सहभागी झाले होते, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान 1 एप्रिल रोजी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान हे दोन दिवसीय अहमदाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्याचा संदर्भ देत बातमी शेअर करण्यात येत आहे. मात्र RSS चे कार्यकर्ते राजगोपाल यांनी स्क्रीनशॉट करत म्हटले आहे की, गुजरातची लोकसंख्या 6.5 कोटी असताना रॅलीसाठी 25 कोटी लोकांची उपस्थिती कशी शक्य आहे?

अनेक ट्वीटर वापरकर्त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करत अशाच प्रकारे दावा केला आहे.





 



 



 



 





 


अशाच प्रकारचा दावा फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.




 

पडताळणी :

अल्ट न्यूजने अशा प्रकारे अनेक फेसबुक पोस्ट आणि ट्वीटच्या फोटोंची पडताळणी केली आहे. त्यानुसार अल्ट न्यूजच्या निदर्शनास आले की, यापैकी कोणत्याही वापरकर्त्याने आपल्या फेसबुक पोस्ट किंवा ट्वीटमध्ये न्यूयॉर्क टाइम्सची लिंक शेअर केली नाही. याव्यतिरीक्त अनेक लोकांनी हा एकच स्क्रीनशॉट व्हायरल केला आहे. या बातमीचा शोध घेण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटला भेट दिली असता तेथे अशा प्रकारची कोणतीही बातमी प्रसिध्द झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बातमी फेक असण्याची शक्यता बळावली.

पुढे अल्ट न्यूजने शोध घेतल्यानंतर असे निदर्शनास आले की व्हायरल स्क्रीनशॉटमधील स्क्रीनग्रॅब आणि द न्यूयॉर्क टाइम्सची वेबसाईट यात फरक दिसून येत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या होम पेजवर तीन महत्वाचे लाईव्ह स्टिकर आहे. त्यात रशिया युक्रेन युध्द, कोरोना महामारी आणि पाकिस्तानमधील राजकीय घडामोडी यांचा सामावेश आहे. मात्र यामध्ये भारताशी संबंधीत कोणत्याही प्रकारच्या घडामोडींसाठीचे लाईव्ह स्टीकर नाही.



 



व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटसोबत एका लाईव्ह पेजची तुलना केली असता त्यामध्ये अल्ट न्यूजला त्यातील फरक दिसून आला.

खऱ्या न्यूयॉर्क टाइम्सच्या फीडमधील लाईव्ह, सबस्क्राईब आणि लॉग इन बटन व्हायरल स्क्रीनशॉटमधील बटनाशी मेळ खात नाही.

हेडलाईनच्या खाली असलेल्या न्यूज डेकच्या फॉन्टचा रंग मेळ खात नाही.

व्हायरल स्क्रीनशॉटमधील न्यूज डेकमध्ये व्याकरणातील चुका दिसून येतात. तसेच वाक्याच्या मध्ये लँडस्लाईडमधील I अक्षर आहे आणि त्याठिकाणी लिहीलेल्या करोड शब्दाऐवजी 25 करोडर्स लोक असे लिहीले आहे.

सर्व प्रकारच्या लाईव्ह पेजवर या गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो.

वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर त्यामध्ये व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच न्यूयॉर्क टाइम्समधील जनसंपर्क विभागाने अशा कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट किंवा बातमी प्रसिध्द केली नसल्याचे सांगत हा दावा फेटाळला आहे.

Tags:    

Similar News