Fact Check | केरळमधील चर्चमधे 7 हजार कोटी सापडले का?

Fact Check it department raids believers church properties fact check;

Update: 2020-11-17 14:18 GMT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपाचा मातृपक्ष म्हणुन प्रपोगंडा पसरवण्यात नेहमी अग्रेसर असतो. भाजपानं कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा केल्यापासून नेहमीच बिगरभाजपाशासित राज्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु आहे. देशात सर्वाधिक साक्षर असलेलं केरळ राज्य सातत्यानं डाव्यांचा बालेकिल्ला राहीलेला आहे. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पिळावळ नेहमीच केरळच्या बदनामीत अग्रेसर असतं. सातत्याने केरळमधे संघाच्या कार्यकर्तानं जीवं मारल्याच्या कथा व्हायरल होत असतात.

शबरीमाला प्रकरण हे संघ आणि भाजपचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप मागील काळात झाला होता. केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात विशिष्ट वयोगटातील महिलांच्या प्रवेश बंदीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले होते. शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाची तुलना बाबरी मशीद वादाशी केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. केरळमध्ये गर्भवती हत्तीणीची क्रूर हत्या करण्यात आल्याने अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे केरळमधून लोकसभेवर निवडणुक गेले होते. या हत्तीनींच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्यांनी राहुल गांधींना टार्गेट केले होते. संघाच्या मुखपत्रांमधे केरळची नेहमीच बदनामी होते.

उदा. रोमन कॅथलिक चर्चमधील ही अत्याचाराची प्रकरणे केवळ भारतातच नाहीत, तर इतर देशांतही घडत आहेत आणि वेळोवेळी तेथील राजकीय परिस्थितीशी ही संस्था कशी जोडली गेलेली आहे यावर तेथील मिशनऱ्यांवर काय कारवाई होते हे अवलंबून आहे. भारतात केरळमध्ये कित्येक वर्षे कम्युनिस्ट राजवट असल्याने रोमन कॅथलिक मिशनरी तयार करण्याचा कारखानाच उघडलेला आहे. राजकीय आश्रयामुळे केरळमधील नन्सवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असले तरी या मिशनऱ्यांवर कारवाई होत नाही, असा संघमुखपत्रांचा आरोप असतो.

संघाच्या निशाण्यावर ईशान्य भारत, गोवा, तसेच दक्षिण भारतातील चर्च आहेत. याचे कारण गेल्या काही दिवसांपासून चर्चचे प्रमुख अधिकारी व धर्मगुरूंनी घेतलेल्या कट्टर भूमिका, हिंदुविरोधी वक्तव्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातील वक्तव्ये, विदेशातून संशयास्पद आर्थिक व्यवहार सांगितले जातात. चर्चमध्ये लैंगिक अत्याचार होत असल्याचे आरोप करण्यात येतात. राज्यातील कोट्टायम येथे चर्चमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली चर्चने तब्बल पाच पाद्रींना निलंबित केले आहे. केरळ राज्यासह संपूर्ण देशभरात या घटनेमुळे खळबळ उडाल्य़ाचे संघाचे म्हणने होते.

चर्चमधील अंतर्गत वाद :

मलंकरा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च असे या चर्चचे नाव आहे. येशू ख्रिस्तासमोर पापक्षालनासाठी आलेल्या महिलेवर या चर्चमधील पाच पाद्रींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. महिला चर्चमध्ये पापक्षालनासाठी आली असता, तिने येशुसमोर दिलेल्या कबुलीचा या पाद्रींनी गैरफायदा घेत तिला 'ब्लॅकमेलिंग' केले व त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र, चर्चने या आरोपींवर कारवाई करण्यात चालढकल केल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे. तसेच, या पाच पाद्रींविरोधात आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा या महिलेने केला आहे. याप्रकरणी चर्चकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, सोशल मीडियातून आणखीही अनेक गोष्टी व्हायरल होत बाब इलियास यांनी यावेळी उघड केली होती. संबंधित पाद्र्यांपैकी तीन पाद्री निरानाम धर्म प्रांताचे असून एक पाद्री दिल्लीतील तसेच, पाचवा पाद्री थुमपामोन धर्म प्रांताचा होता.

सोशल मिडीयातून वारंवार असे अप्रपचार होत असल्याने केरळ सरकारने याविरोधात कायदा करण्याचे निश्चित केले होते. विरोधानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला असला तरी बदनामीचे सत्र सुरुच आहे.

वारंवार केरळमधील चर्चवर सरकारी नियंत्रण असावं असा हिंदुत्ववाद्यांच म्हणनं असतं.

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने चर्चचे व्यवस्थापन करण्यासाठी देवस्थान व्यवस्थापनाच्या धर्तीवर संरचना करणे प्रस्तावित आहे. 'केरळ चर्चचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणतेही नवीन कायदे आणले गेले, तर त्याविरुद्ध गंभीर परिणाम होतील', अशी चेतावणी आंतर चर्च परिषदेने दिल्यानेच सरकारकडून असे सांगण्यात आल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

आता आपण असेच एक प्रकरण पाहुयात...महीनाभरापासून फेसबुक, व्हाट्सअपसह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर एक मेसेज व्हायरल होत आहेत. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांना असा मेसेज आला असेल की केरळच्या चर्चमधे ७ हजार कोटीचं घबाड सापडलं परंतू मिडीया ही बातमी तुम्हाला दाखवणार नाही. मात्र आता याविषयी वेगळीच माहिती समोर आली आहे.

व्हायरल पोस्ट्स :


https://www.hindujagruti.org/news/129880.html

काय आहे प्रकरण :

५ नोव्हेंबर रोजी मेट्रोपॉलिटन आर्चबिशप अथनासियस योहान १ (के.पी. योहानन) यांच्या धार्मिक प्रतिष्ठान असलेल्या तिरुवल्ला-आधारित बेलिव्हरच्या ईस्टर्न चर्चच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला. ही कारवाई सकाळी सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. केरळच्या या चर्चशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींच्या कार्यालये आणि निवासस्थानावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. छापा टाकल्या गेलेल्या जागांपैकी तिरुवल्ला येथील चर्चचे मुख्यालय, चर्चद्वारे चालवले जाणारे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि निवासस्थानं होती.चर्च मुख्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमधून अधिका्यांनी ₹ 57 लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. धार्मिक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक कागदपत्रे देखील हस्तगत केली आहेत.मॅक्स महाराष्ट्राच्या सखोल पाहणीत अधिकाऱ्यांनी कर चुकवेगीरी आणि अनधिकृत परकीय व्यवहारावरील माहीती मिळाल्यानंतर छापा टाकल्याचे सांगितले होते. स्वयंसेवी संस्थांमार्फत कोट्यवधी रुपये परकीय निधी मिळाल्याचा आरोप झाल्यानंतर चर्च केंद्र सरकारच्या रडारवर आली होती. अहवालानुसार 2015-16 वर्षात ₹2,397 कोटींची रोख गुंतवणूक केली होती, ज्यात नवीन परदेशी निधी, इतर स्थानिक स्रोतांकडून हस्तांतरण, मागील वर्षातील योगदान आणि त्यांचे व्याज यांचा समावेश होता. 2017 मध्ये, गृह मंत्रालयाने चर्च आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या तीन स्वयंसेवी संस्थांना परकीय निधी मिळण्यास मनाई केली होती.

निष्कर्ष : केरळमधील एका चर्चवर आयकर विभागातील धाडसत्रात ७ हजार कोटीपेक्षा जास्त रुपये जप्त केल्याचा दावा मॅक्स महाराष्ट्राच्या तपासणीत खोटा ठरला आहे. या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात सोशल मिडीया आणि मिडीयामधे धाडसत्रात मोठं घबाड मिळालं असून प्रसारमाध्यमं जाणीवपूर्व बातम्या देत नसल्याचं म्हटलं होतं. परंतू कारवाईदरम्यान फक्त ५७ लाख रुपये जप्त झाल्याचं स्पष्ट झालं आहे.










Tags:    

Similar News