Fact Check | महाराष्ट्रातील हिंदुंच्या मोर्चामध्ये मुस्लिमांचा खोडा ? आंध्रप्रदेशमधील जुना व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हिंदु मुस्लिम वादाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, त्याची शहानिशा करण्याची गरज असते.

Update: 2023-02-11 05:28 GMT

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 29 जानेवारी 2022 रोजी हिंदु संघटनांनी आपल्या 5 मागण्यांसाठी एका मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदु परिषद (VHP), बजरंग दल (Bajrang Dal) या संघटनांच्या नेत्यांसोबतच भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि आमदार सहभागी झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओला शेअर करत दावा कऱण्यात आला आहे की, मुस्लिम समुदायातील लोकांनी या मोर्चामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता.

भाजपाचे कार्यकर्ते पंडित श्रीकांत उपाध्याय यांनी व्हिडिओ शेअर करत पोस्ट केलीय की, महाराष्ट्रात मुस्लिम समुदायातील लोकांनी हिंदुंच्या मोर्चामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे धार्मिक दंगल झाली नाही. (Archive Link)


रामपाल सिंह नावाच्या एका नेटिझन्सनेही उपाध्याय यांच्यासारखाच दावा केला होता. (Archive Link)


भाजपाचे कार्यकर्ते तरूण भाटी यांनीही असाच दावा करत ट्विट केले होते. (Archive Link)

आणखीही काही नेटिझन्सनी याच दाव्याने व्हिडिओ शेअर केला होता.

पडताळणी (What is Fact )

या घटनेची पडताळणी केल्यानंतर आम्हांला माहिती मिळाली की, व्हायरल झालेला हा व्हिडिओ आंध्र प्रदेश मधील नेल्लोर इथला असून तो एप्रिल 2022 चा आहे. ऑल्ट न्यूज ने 2022 मध्ये याच व्हिडिओ सोबत आणखी एका दाव्याचा फॅक्ट चेक केला होता. तेव्हा भाजपा नेते आणि काही माध्यमांनी मशिदीमधून दगडफेक आणि बिअरच्या बाटल्या फेकण्यात आल्याचा खोटा दावा केला होता.

शोभा यात्रेत उपस्थित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते (ABVP) आणि मशिदीत हजर असलेल्या लोकांनी सांगितले होते की, दोन्ही गटातील लोकांनी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी तिथे बाचाबाचीही झाली, त्याठिकाणी काही चिन्हं दाखवण्यात आली होती. मशिदीतून दगड किंवा बिअरच्या बाटल्या फेकण्यात आल्या नव्हत्या.

24 एप्रिल 2022 मध्ये आंध्र प्रदेश च्या (Andhra Pradesh) नेल्लोर मध्ये (Nellor) अल कुद्दुस मशिदीच्या समोरून हनुमान शोभा यात्रा जात होती. तेव्हा ही घटना घडली. नेल्लोर चे तत्कालीन पोलीस अधीक्षक सीएच विजया राव यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, एका प्वॉईंटवर शोभायात्रा मशिदीसमोरून जात होती. त्यावेळी डीजेचा आवाज मोठा होता, त्याचवेळी तरूणांनी बाईकचाही आवाज वाढवला होता...आणि ते 'जय श्रीराम' च्या घोषणा देत होते. त्याचवेळी मशिदीत असलेल्या तरूणांनी 'अल्लाह ओ अकबर' च्या घोषणा देत काही चिन्हं दाखवले. याव्यतिरिक्त दगडफेक किंवा बाटल्या फेकण्याचा प्रकार घडलेला नाही किंवा कुठलीही झटापट झालेली नाही".

काय आहे सत्य (What is Reality)

एकूणच, काही सोशल मीडिया यूजर्स ने एप्रिल 2022 मध्ये आंध्रप्रदेशमधील नेल्लोर मध्ये झालेल्या घटनेला महाराष्ट्रातील हिंदु संघटनांच्या मोर्चाशी जोडून खोट्या दाव्यासोबत शेअर केले. 

(सौजन्य - अल्ट न्यूज)  https://www.altnews.in/hindi/old-video-from-andhra-pradesh-shared-as-muslim-disturbing-hindutva-rally-mumbai/

Tags:    

Similar News