Fact Check : राहुल गांधी BBC डॉक्यूमेंट्री च्या निर्मात्यासोबत ? व्हायरल फोटोमागील सत्य काय ?

Update: 2023-02-27 08:04 GMT

भाजप सरकारनं २०२१ च्या IT कायद्यानुसार इमरजेंसी पॉवर चा उपयोग करून भारतात BBC ची डॉक्यूमेंटरी ‘India : The Modi Question’ च्या प्रसारणावर निर्बंध घातले. या डॉक्यूमेंट्रीत २००२ मध्ये गुजरातमधील दंगलीमध्ये नरेंद्र मोदींच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते.

याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा एक फोटो शेयर करत दावा केला की, मागील वर्षी राहुल गांधी हे या डॉक्यूमेंट्रीच्या निर्मात्यांना भेटले होते.

जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता (Ex Deputy CM Kavindar Gupta) यांनी देखील हाच फोटो शेयर करत लिहिलं होतं की, “ ६ महिन्यांपूर्वी BBC च्या डॉक्यूमेंटरी च्या निर्मात्यांसोबत राहुल. त्यामुळं असं वाटतं की, ६ महिन्यांपूर्वी डॉक्यूमेंट्रीची चं नियोजन झालं होतं आणि आर्थिक मदतही....?”

आंध्र प्रदेश चे प्रदेश महासचिव विष्णु वर्धन रेड्डी यांनी देखील व्हायरल फोटो शेयर केला. त्यात ते लिहितात, “ ६ महिन्यांपूर्वी @RahulGandhi UK (इंग्लड) ला गेले आणि BBC च्या निर्मात्यांना भेटले. एक फोटो एक हजार शब्दांच्या समान असतो”.

वेरीफाईड 

ट्विटर युजर्स ने देखील हा फोटो ट्विट केला आहे.

@RudraBvm नावाच्या एका ट्विटर अकाऊंट ने देखील याच दाव्यासहित फोटो ट्विट केला आहे. ऑल्ट न्यूज ने हे आर्टिकल लिहिपर्यंत ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो पाहिला होता. या फोटोखाली एक टेक्स्ट पण लिहिण्यात आलंय. ज्यात लिहिलेलं आहे की, “ ६ महिन्यांपूर्वी राहुल UK ला गेले आणि BBC च्या निर्मात्यांना भेटले. आता आम्हांला त्या भेटीमागचं कारण समजलंय”.

Rahul and the BBC producer. Think about it. pic.twitter.com/ZR7Kv8Tm3a

— anil nag 2.0🇮🇳 (@RudraBvm) January 25, 2023

शेकडो ट्विटर युजर्सनी याच पद्धतीच्या दाव्यांसह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सल्ला देत फोटो शेयर केला की, “ राहुल गांधी यांनी BBC डॉक्यूमेंट्री च्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हे षडयंत्र रचलं”. ऑल्ट न्यूज ने खाली एक स्क्रीन रेकॉर्डिंग ठेवलीय, त्यात स्पष्टपणे दिसतंय की हा फोटो ट्विटरवर किती वायरल झाला आहे. हाच फोटो फेसबूकवरही वायरल होतोय.



Fact Check

ऑल्ट न्यूज ने गुगल लेन्स चा वापर करून रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर त्यांना यासंदर्भात अनेक लेख आढळले. यात मे २०२२ मध्ये राहुल गांधी जेव्हा लंडनच्या यात्रेवर होते, त्यावेळी काढलेला हा फोटो आहे.



 



या फोटोत राहुल गांधी यांच्या सोबत लेबर MP जेरेमी कॉर्बिन आणि उजवीकडे उद्योजक सैम पित्रोदा आहेत. पित्रोदा यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. पित्रोदा हे काँग्रेस पक्षाचे निकटवर्तीय आहेत.

अलिकडेच राहुल गांधी आणि BBC निर्मात्यांच्या भेटीच्या दाव्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोबाबत खुद्द सैम पित्रोदा यांनीही खुलासा केलाय.

एकंदरीतच, व्हायरल होत असलेला फोटो हा BBC च्या निर्मात्यांसोबतच्या भेटीचा नाही. प्रत्यक्षात हा व्हायरल होत असलेला फोटो राहुल गांधींच्या लंडन यात्रेवेळी लेबर MP जेरेमी कॉर्बिन आणि सैम पित्रोदा यांच्या भेटीचा आहे.

साभार – ऑल्ट न्यूज 

https://www.altnews.in/hindi/rahul-gandhis-photo-with-uk-politician-falsely-viral-as-him-meeting-bbc-modi-docu-producer/

Tags:    

Similar News